मोदींचा मित्र पुन्हा येतोय! इस्त्रायलमध्ये पुन्हा अस्थिरता; उद्या पाच वर्षांतील चौथी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 01:17 PM2022-10-31T13:17:59+5:302022-10-31T13:18:16+5:30
नेतन्याहूंच्या पक्षाला लिकुड पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सहकारी पक्षांच्या मदतीने ते सरकार स्थापन करू शकतात, असे एक्झिट पोल आहेत.
इस्त्रायल हा देश राजकीय दृष्ट्या जगातील सर्वात अस्थिर देश बनला आहे. गेल्या पाच वर्षांत या देशात चौथ्यांदा निवडणूक होत आहे. उद्या होणाऱ्या मतदानात माजी पंतप्रधान आणि मोदींचे मित्र बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या पक्षाला लिकुड पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सहकारी पक्षांच्या मदतीने ते सरकार स्थापन करू शकतात, असे एक्झिट पोल आहेत.
नेतन्याहू यांचे विरोधक लॅपिडदेखील कडवी टक्कर देत आहेत. त्यांची येश अतीद पार्टी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरू शकतो. इस्त्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी स्वत:ला यावेळी निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. ते ही निवडणूक लढविणार नाहीएत. यामुळे ही निवडणूक नेतन्याहू विरुद्ध लॅपिड अशी झाली आहे.
आतापर्यंतच्या निवडणूकपूर्व सर्व्हेंमध्ये नेतन्याहू यांना लॅपिड कडवी टक्कर देत असल्याचे समोर आले आहे. परंतू लिकुड पक्ष सहकारी पक्षांच्या मदतीने बहुमत मिळवू शकतो. Israel Hayom या इस्त्रायली न्यूज आऊटलेटनुसार नेतन्याहू यांचा पक्ष या निवडणुकीत ३० जागा जिंकू शकतो. मात्र, त्यांच्या सहकारी पक्षांना चांगल्या जागा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. ही एकत्रित ६१ जागा होणार आहेत. Yesh Atid party ला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. नेतन्याहू विरोधकांच्या एकत्रित जागा या ५९ वर जाऊ शकतात. म्हणजेच बहुमताला दोन जागा कमी पडणार आहेत. पुन्हा इस्त्रायलमध्ये काठावरचे सरकार येणार असल्याने अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
काही दुसऱ्या सर्व्हेंमध्ये नेतन्याहू आणि लॅपिड यांच्यात समसमान जागा मिळण्याचे दाखविण्यात आले आहे. इजरायली डेली Maariv नुसार दोघांनाही ६०-६० जागा मिळू शकतात. तीन अन्य सर्व्हेंमध्ये देखील हीच आकडेवारी दिसत आहे. 20 जागांच्या इस्त्रायली निवडणुकीत, ज्या पक्षाला जास्त मतदान होईल, त्याच्या विजयाची शक्यता जास्त आहे. इस्रायलमधील लोक कधीही कोणत्याही उमेदवाराला मत देत नाहीत, तर ते पक्षाला मतदान करतात.
जर संसदेत खासदार हवा असेल तर एका जागेसाठी पक्षाला राष्ट्रीय मताच्या किमान 3.25% मते मिळावी लागतात. त्याच्या गुणोत्तरामध्ये खासदारांची संख्या वाढविता येते. इस्त्रायलमध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असलेली निवडणूक प्रक्रिया आहे. पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या संख्येनुसार जागा मिळतात.