यूएई दौ-यात मोदींचे मिशन दाऊद, संपत्तीवर टाच आणणार ?

By admin | Published: August 17, 2015 10:27 AM2015-08-17T10:27:22+5:302015-08-17T15:46:00+5:30

दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती (यूएई) दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौ-यातून आता दाऊदचा 'गेम' करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

Modi's mission in the UAE tour, Dawood will bring a lot of wealth? | यूएई दौ-यात मोदींचे मिशन दाऊद, संपत्तीवर टाच आणणार ?

यूएई दौ-यात मोदींचे मिशन दाऊद, संपत्तीवर टाच आणणार ?

Next
>ऑनलाइन लोकमत 
 
अबूधाबी, दि. १७ -  दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौ-यातून आता दाऊदचा 'गेम' करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या दौ-यात मोदी दाऊदच्या आखाती देशांतील मालमत्तेवर टाच आणण्यासंदर्भात यूएई सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. मोदींना यात यश आले तर दाऊद विरोधात भारताची ही मोठी कारवाई ठरेल असे दिसते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून दोन दिवसांच्या यूएई दौ-यावर आहेत. तब्बल साडे तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधान यूएई दौ-यावर असून व्यापार, दहशतवादविरोधी मोहीम अशा विविध मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहेत. यातील दहशतवाद विरोधी मोहीमेतील चर्चेत मोदी दाऊदची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात यूएई सरकारशी चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दाऊदच्या यूएईतील संपत्तीची यादीच तयार केली असून ही यादी यूएई सरकारला दिली जाईल. युएईतील दाऊदची मालकी असलेल्या, समभाग असलेल्या व बेनामी मालमत्ता जप्त करावी अशी विनंती स्थानिक सुरक्षा यंत्रणांना केली जाईल. 
 
मोदींच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौ-यातील ठळक घडामोडी:
 
- आखाती देशातील गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आमंत्रण देताना भारतामध्ये एक लाख कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या संधी असल्याचे मोदी म्हणाले.
- गेल्या ३४ वर्षांमध्ये ज्या उणीवा निर्माण झाल्या त्या भरून काढू आणि जलदगतीने काम करण्याचा प्रयत्न करण्याचे मोदींचे आश्वासन.
- आधीच्या सरकारकडून सध्याच्या सरकारला थोर वारसा मिळालेला नाही त्यामुळे काही उणीवा असल्याचे मोदींनी मान्य केले, परंतु भारताचे वाणिज्य मंत्री गुंतवणूकदारांना भेटतील आणि समस्यांचं निराकारण करतील अशी ग्वाही मोदींनी दिली.
- एका बाजुला भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय, तर दुस-या बाजुने जगाचं लक्ष आशियाकडे लागलेलं आहे. संयुक्त अरब अमिरातीखेरीज आशिया परीपूर्ण होऊ शकत नाही असं सांगत मोदींनी अमिरातींची ताकद आणि भारताची क्षमता एकत्र आली तर हे शतक आशियाचं असेल असं म्हटलं.
- सगळ्या गुंतवणूकदारांनी भारतात यावं असं आवाहन मोदींनी मेदसर या शहरात बोलताना केलं.
- भारतामध्ये खूप संधी असल्याचं सांगताना मोदी म्हणाले की १२५ कोटी जनता ही केवळ एक बाजारपेठ नसून तो एक सामर्थ्याचा स्त्रोतही आहे.
- आम्हाला तंत्रज्ञान, वेग आणि दर्जेदार बांधकामाची आवश्यकता असून कमी खर्चातल्या घरांची उभारणी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
- भारताच्या कृषिक्षेत्राला शीतगृहाच्या तसेच गोदामांच्या जाळ्याची गरज आहे.
- पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि बांधकाम उद्योग या क्षेत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीतील गुंतवणूकदारांना प्रचंड संधी असल्याचे मोदी म्हणाले.
- भारतात उद्योग सुरू करायचा तर अडथळ्यांची शर्यत असल्याचे सांगताना सिंगल विंडो क्लीअरन्ससारख्या योजना हव्यात अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.
- या भेटीत नरेंद्र मोदींनी आशियातल्या सगळ्यात मोठ्या मशिदीला - अबुधाबीतील शेख झायेद मशिद - भेट दिली. जवळपास ६२ हजार चौरस फूटांचं हस्तकला निर्मित कारपेट असलेल्या या मशिदीमध्ये त्यांनी शेख हमदान बिन मुबारक अल नाहयान या उच्च शिक्षण मंत्र्यासोबत सेल्फी काढला.
 
अबूधाबीत मंदिरासाठी सरकार जागा देणार 
आखाती देशांमध्ये जवळपास २६ लाख भारतीय राहत असून दुबईसारखा अपवाद वगळता हिंदूंच्या मंदीराची सोय अभावानं आहे. मात्र, आता आबुधाबीच्या सरकारनं हिंदू मंदीरासाठी जागा देण्याचे मान्य केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Modi's mission in the UAE tour, Dawood will bring a lot of wealth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.