अमेरिकेला भावला मोदींचा 'सबका साथ सबका विकास'

By admin | Published: July 29, 2014 12:29 PM2014-07-29T12:29:37+5:302014-07-29T12:30:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास हा नारा अमेरिकेला चांगलाच भावला असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी मोदींचे हे विचार कौतुकास्पद असल्याचे सांगत मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहत.

Modi's 'Sabkaa Ke Sabka Vikas' | अमेरिकेला भावला मोदींचा 'सबका साथ सबका विकास'

अमेरिकेला भावला मोदींचा 'सबका साथ सबका विकास'

Next

ऑनलाइन टीम

वॉशिंग्टन, दि.२९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास हा नारा अमेरिकेला चांगलाच भावला असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी मोदींचे हे विचार कौतुकास्पद असल्याचे सांगत मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहत. अमेरिका भारतातील नवनियुक्त सरकारच्या या प्रयत्नांमध्ये साथ द्यायला तयार आहे असे केरी यांनी म्हटले आहे. 
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री उद्या (बुधवारी) भारत दौ-यावर येत असून या दौ-यात ते भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याची दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर चर्चा करतील. भारत दौ-यावर रवाना होण्यापूर्वी अमेरिकेतील एका थिंक टँकतर्फे आयोजित कार्यक्रमात केरी यांनी मोदींचे भरभरुन कौतुक केले. 'भारतातील नवनियुक्त सरकारने दिलेला सबका साथ सबका विकास हा नारा एक नवीन सिद्धांत आहे. या विचारधारेचे आम्ही समर्थन करतो. अमेरिकेतील खासगी कंपन्या भारतातील आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहेत' असे केरी यांनी सांगितले. पंतप्रधानपदा्च्या शपथविधी सोहळ्यात पाकिस्तान व अन्य शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रीत करण्याच्या मोदींच्या निर्णयाचे त्यांनी कौतूक केले. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी तरुणांवर लक्ष केंद्रीत केले होते.  युवा वर्गासाठी मोदींना मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबवायचा आहे. अमेरिकेत सध्या लाखभर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून अमेरिकेतील महाविद्यालय २१ व्या शतकानुसार मनुष्यबळ विकास घडवतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवणे गरजेचे असून मोदीही यासाठी तयार असतील अशी आशाही केरी यांनी वर्तवली. मोदींमुळे भारतात भगवी क्रांती आली असून हा भगवा रंग म्हणजे उर्जा दाखवणारा आहे असेही केरींनी स्पष्ट केले.

Web Title: Modi's 'Sabkaa Ke Sabka Vikas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.