मोदींचा सिलीकॉन व्हॅली दौरा
By admin | Published: July 19, 2015 11:28 PM2015-07-19T23:28:30+5:302015-07-19T23:28:30+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर
Next
सॅनफ्रान्सिस्को : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सिलीकॉन व्हॅलीला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौरा करणार असून ते यावेळी सिलीकॉन व्हॅलीला भेट देतील. पं. नेहरू यांनी १९४९ साली कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. तेव्हा या भागाला सिलीकॉन व्हॅली हे नाव नव्हते. १९७० नंतर कॅलिफोर्नियाचा काही भाग सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखला जाऊ लागला. या भागाचे वैशिष्ट्य असे की, सिलीकॉन व्हॅली हे अनिवासी भारतीयांचे हक्काचे ठिकाण आहे.