आॅस्ट्रेलियन संसदेत मोदींचे भाषण होणार
By admin | Published: October 21, 2014 03:09 AM2014-10-21T03:09:38+5:302014-10-21T03:09:38+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी-२०’ अधिवेशनासाठी पुढच्या महिन्यात आॅस्ट्रेलियाला जाणार असून, या दौऱ्यात तेथील संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
मेलबर्न : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी-२०’ अधिवेशनासाठी पुढच्या महिन्यात आॅस्ट्रेलियाला जाणार असून, या दौऱ्यात तेथील संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांसमोर मोदी यांचे भाषण होणार आहे. भारताच्या पंतप्रधानांचे आॅस्ट्रेलियातील संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताच्या पंतप्रधानांची गेल्या तीस वर्षांतील ही पहिलीच आॅस्ट्रेलिया भेट आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियन संसद सदस्य आनंदी आहेत.
१५ व १६ नोव्हेंबर रोजी जी-२० शिखर परिषद असून, त्यानंतर पंतप्रधान मोदी आॅस्ट्रेलियन संसदेत बोलणार आहेत. संसदेच्या अधिवेशनात बोलणाऱ्या इतर नेत्यांत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे आहेत. (वृत्तसंस्था)