कर्जबाजारी पाकसाठी बुरे दिन! पैशांसाठी अन्य देशांच्या अटी मान्य करण्याची वेळ; मंत्र्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:33 PM2022-01-11T12:33:20+5:302022-01-11T12:34:18+5:30

आमच्याकडे गरजा भागवण्यासाठीची आर्थिक क्षमताच नाही, असे पाकिस्तानच्या मंत्र्याने म्हटले आहे.

moeed yusuf said imran khan government cannot implement its own policies becoz debt | कर्जबाजारी पाकसाठी बुरे दिन! पैशांसाठी अन्य देशांच्या अटी मान्य करण्याची वेळ; मंत्र्यांची कबुली

कर्जबाजारी पाकसाठी बुरे दिन! पैशांसाठी अन्य देशांच्या अटी मान्य करण्याची वेळ; मंत्र्यांची कबुली

Next

इस्लामाबाद: गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान कर्जाच्या बोजाखाली दबला गेला आहे. पाकिस्तानात अनेक समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यातच पाकिस्तान आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहिलेला नाही, हे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ यांनीच स्वत: मान्य केले आहे. पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात इतका फसला आहे की, त्यांना दुसऱ्या देशांच्या अटी मान्य कराव्या लागतायत, असे युसुफ यांनी म्हटले आहे. 

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये वेगाने बदल होत असून त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील नागरी आणि आर्थिक समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करू लागल्या आहेत. विशेषत: पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही स्वावलंबी होऊ शकलेली नसून त्याचाच परिणाम इतर क्षेत्रांवर होऊ लागला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण देखील संकटात सापडल्याची भूमिका युसुफ यांनी व्यक्त केली आहे.

आमच्याकडे गरजा भागवण्यासाठीची आर्थिक क्षमताच नाही

आमच्याकडे गरजा भागवण्यासाठीची आर्थिक क्षमताच नाही. आणि जोपर्यंत आम्ही आमच्या आर्थिक गरजा देशातच भागवू शकत नाही, तोपर्यंत आमचे विदेशी आर्थिक मदतीवरचे अवलंबित्व कमी होणार नाही. पाकिस्तानकडे आर्थिक स्वावलंबित्व नाही. त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्या प्रभावापासून स्वतंत्र होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या देशातच पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आम्ही विदेशी मदतीचा पर्याय निवडतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इतर देशांकडून कर्ज घेता, तेव्हा तुमचे आर्थिक सार्वभौमत्व धोक्यात येते. त्याचा तुमच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम होतो. पाकिसस्तानवर अमेरिकेचा प्रभाव आहेच, पण मला शंका आहे की इतर देश देखील अशाच प्रकारे अमेरिकेच्या प्रभावाखाली आहेत, असे युसुफ यांनी नमूद केले आहे. 
 

Web Title: moeed yusuf said imran khan government cannot implement its own policies becoz debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.