बांगलादेशचे मोहम्मद युनूस सरकार पाकिस्तानवर मेहरबान; भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:38 PM2024-11-19T13:38:19+5:302024-11-19T13:49:48+5:30
बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत थेट सागरी संपर्क करत आहे.
बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. आता बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानवर मेहरबान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, समुद्रमार्गे वाढता व्यापार चर्चेत आला आहे. सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश सरकारने पाकिस्तानी मालाला तपासणीतून दिलासा दिला होता आणि आता एक पाकिस्तानी जहाज चितगावला पोहोचले.
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
पाकिस्तानमधील कराची येथून हे जहाज बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचले. ११ नोव्हेंबर रोजी त्याच जहाजातून माल बांगलादेशात उतरवण्यात आले, त्या जहाजाला तपासणीतून सूट देण्यात आली. पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी कच्चा माल आणि खाद्यपदार्थ घेऊन जात होते. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत सय्यद अहमद मारूफ यांनी हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंधांमधील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, येणारा काळ दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नवीन संधी उघड करेल.
बांगलादेशला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी थेट सागरी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आवश्यक चाचणीवरही बंदी घातली होती. आता बांगलादेशात पाकिस्तानमधून अशाच प्रकारच्या आयातीवर लादण्यात आलेले निर्बंधही बरेच शिथिल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आशिया खंडावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार देखील चितगावजवळ आहे. याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होईल.
भारत अनेक दिवसांपासून चितगाव बंदरावर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अनेकवेळा भारताने येथे आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. आता पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढणारे सागरी व्यापारी संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनू शकतात.