"शेख हसीना यांनी शांत...", मोहम्मद युनूस यांनी दिला सल्ला, म्हणाले, 'भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:27 PM2024-09-05T14:27:08+5:302024-09-05T14:31:43+5:30
बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांत्तर झाले. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आपला देशही सोडला.
मागील काही महिन्यांपासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणासाठी निदर्शने सुरू होती. या निदर्शनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या निदर्शनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना सध्या भारतात वास्तव्यास आहेत. दरम्यान, बांगलादेशच्या नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्याबाबत विधान केले आहे. बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्याबाबत भाष्य केले.
मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर
मोहम्मद युनूस म्हणाले की,शेख हसीना भारतात बसून बांगलादेशबाबत राजकीय वक्तव्य करत आहेत, जे योग्य नाही. दोन्ही देशांमधील सौहार्द कायम ठेवण्यासाठी त्यांना तोंड बंद करून बसावे लागेल. आम्ही भारत सरकारकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती करू. जर भारताला शेख हसीना यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण होईपर्यंत ठेवायचे असेल तर त्यासाठी शेख हसीना यांना गप्प बसावे लागेल, अशी अट आहे. त्यांनी राजकीय भाष्य टाळावे लागेल, असंही ते म्हणाले.
मोहम्मद युनूस ढाका येथे एका मुलाखतीदरम्यान म्हणाले की, बांगलादेश भारतासोबत मजबूत संबंधांना प्राधान्य देतो. बांगलादेशातील अवामी लीग वगळता इतर पक्षांना इस्लामिक पक्ष म्हणून पाहणाऱ्या कथनाच्या वर भारतालाही उठावे लागेल. शेख हसीनाशिवाय बांगलादेश एकप्रकारे अफगाणिस्तानात बदलेल, असे भारताला वाटते.
ते म्हणाले की, बांगलादेश भारतासोबत मजबूत संबंधांना प्राधान्य देतो. भारतालाही त्या नॅरेटीव्हच्या वेगळे पाहावे लागेल, यात अवामी लीग शिवाय बांगलादेशातील वेगळे पक्ष इस्लामिक असल्याचे पाहतात. शेख हसीना यांच्याशिवाय बांगलादेश एकप्रकारे अफगाणिस्तानात बदलेल, असे भारताला वाटते, असंही ते म्हणाले.
मोहम्मद युनूस म्हणाले की, शेख हसीना भारतात राहिल्या हे आम्हाला पटत नाही. आम्हाला लवकरात लवकर त्यांचे प्रत्यार्पण करायचे आहे जेणेकरून त्यांच्यावर खटला चालवता येईल. भारतात राहूनही त्या सतत विधाने करत आहेत, ही समस्या आहे. त्या भारतात शांत राहिल्या असत्या तर आम्ही त्यांना विसरलो असतो. बांगलादेशातील जनताही त्यांना विसरल्या असत्या पण त्या भारतात बसून सतत वक्तव्ये करत आहेत.