शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:39 PM2024-08-13T15:39:12+5:302024-08-13T15:41:33+5:30

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर सत्तापालट झालं असून त्याठिकाणी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार देशात आलं आहे. 

Mohammad Yunus visited Dhakeshwari Hindu temple in Bangladesh, Sharad Pawar had stated that Yunus was secular. | शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले?

शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले?

ढाका - बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. पुण्यातील पत्रकारांशी बोलताना पवारांनी मोहम्मद युनूस स्वतः पक्के सेक्यूलर आहेत. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढावं असं काम करणार नाहीत असं कौतुक केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याची प्रचिती बांगलादेशात पाहायला मिळाली. 

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे मंगळवारी ढाकेश्वरी मंदिरात पोहचले. त्याठिकाणी हिंदू समुदायातील लोकांसोबत युनूस यांनी संवाद साधला. यावेळी अल्पसंख्याकांचे ५ सदस्यीय शिष्टमंडळ युनूस यांना भेटले. त्यात ८ प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. बांगलादेशात गेल्या काही दिवसांत हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत अशावेळी युनूस यांनी केलेला दौरा महत्त्वाचा ठरतो. 

मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिरातून लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, देशात संकटाची स्थिती असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये फूट नव्हे तर एकजूट करायला हवी. या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी धैर्याने सोबत राहायला हवं. आपल्याला असा बांगलादेश घडवायचा आहे जे एका कुटुंबासारखे हवं. कुटुंबात मतभेद, भांडणाचा प्रश्न येत नाही. आपण सर्वच बांगलादेशी आहोत. बांगलादेशात शांतता नांदावी यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकांनी धर्म आणि जातीच्या आधारे भेदभाव न करता देशातील सर्वांसाठी एक कायदा आणि एक संविधान असायला हवं असंही भाष्य त्यांनी केले.

काय म्हणाले होते शरद पवार?

मोहम्मद युनूस बारामतीत आले होते. बांगलादेशातील परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला होता. त्यावर माझ्या माहितीप्रमाणे मोहम्मद युनूस स्वतः पक्के सेक्यूलर आहेत. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढावे, असे काम करणार नाहीत. त्यामुळे बॅलेन्स भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची बांगलादेशला गरज होती. तेथील परिस्थिती ते सुधारणा आणू शकतील. भारत सरकारने बांगलादेशमधील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली होती. 
 

Web Title: Mohammad Yunus visited Dhakeshwari Hindu temple in Bangladesh, Sharad Pawar had stated that Yunus was secular.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.