प्राणिसंग्रहालयातून पळाले माकड
By admin | Published: January 21, 2017 05:22 AM2017-01-21T05:22:42+5:302017-01-21T05:22:42+5:30
इस्रायलच्या तेव अवीव शहरातील एका प्राणिसंग्रहालयातील माकड पळून गेल्याने मोठी पंचाईत झाली
तेल अवीव : इस्रायलच्या तेव अवीव शहरातील एका प्राणिसंग्रहालयातील माकड पळून गेल्याने मोठी पंचाईत झाली आहे. सध्या या माकडाचा शोध घेतला जात आहे. या प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी रमत गन सफारी यांनी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला हे १७ वर्षीय माकड येथून पळून गेले. अर्थात, या माकडापासून तसा धोका नाही. पण, सामान्य नागरिकांसाठी ते काही अडचणी निर्माण करू शकते. तेल अवीवच्या आॅफिशियल व्टिटर अकाउंटवरून नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. आपण जर या माकडाला पाहिले तर, आम्हाला फोनवरून कळवा, असे आवाहनही यात करण्यात आले आहे. हे माकड दिसल्यावर त्याच्यावर नजर ठेवा आणि आम्हाला तत्काळ कळवा. कुठलाही आवाज करू नका. अशा सूचनाच यात देण्यात आल्या आहेत.