Monkeypox : लहान मुलांना मंकीपॉक्सचा मोठा धोका! 20 दिवसांत 21 देशांमध्ये 226 रुग्ण; ICMRचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:34 PM2022-05-28T20:34:38+5:302022-05-28T20:41:27+5:30

Monkeypox : भारतात मंकीपॉक्सच्या एकाही केसची पुष्टी झालेली नाही, परंतु या संसर्गाबाबत सरकार हाय अलर्टवर आहे.

Monkeypox outbreak cases updates argentina us belgium uk spain italy canada | Monkeypox : लहान मुलांना मंकीपॉक्सचा मोठा धोका! 20 दिवसांत 21 देशांमध्ये 226 रुग्ण; ICMRचा गंभीर इशारा

Monkeypox : लहान मुलांना मंकीपॉक्सचा मोठा धोका! 20 दिवसांत 21 देशांमध्ये 226 रुग्ण; ICMRचा गंभीर इशारा

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचं पाहून इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) गंभीर इशारा दिला आहे. हेल्थ एजन्सीचे दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांना हा आजार होण्याचा धोका सर्वात जास्त आहे, त्यामुळे त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे लागेल. भारतात मंकीपॉक्सच्या एकाही केसची पुष्टी झालेली नाही, परंतु या संसर्गाबाबत सरकार हाय अलर्टवर आहे.

भारतीय प्रायव्हेट हेल्थ डिव्हाईस कंपनी ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने मंकीपॉक्सची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी किट तयार केली आहे. हे किट 1 तासात निकाल देण्यास सक्षम असेल. शुक्रवारी अर्जेंटिनामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला. हा रुग्ण नुकताच स्पेनमधून परतला आहे. 21 देशांमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सच्या 226 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. डब्ल्यूएचओने शुक्रवारी सांगितले की ज्या देशांमध्ये मंकीपॉक्स सामान्यतः आढळत नाही अशा देशांमध्ये जवळपास 100 संशयित रुग्ण आढळले आहेत. 7 मे रोजी यूकेमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

मंकीपॉक्स व्हायरसमध्ये आत्तापर्यंत कोणतेही अनुवांशिक बदल आढळून आलेले नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. म्हणजेच, व्हायरस अद्याप मानवांमध्ये म्यूटेट झालेला नाही. हा रोग आफ्रिकेबाहेर कसा पसरला, हे शोधण्याचा शास्त्रज्ञ अजूनही प्रयत्न करत आहेत. स्पेन हे या महिन्यात झालेल्या मंकीपॉक्सच्या उद्रेकाचे केंद्र मानलं जातं आहे. शुक्रवारपर्यंत येथे 98 रुग्णांची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, ब्रिटनमध्ये 106 आणि पोर्तुगालमध्ये 74 रुग्ण या दुर्मिळ आजाराच्या विळख्यात आहेत. याशिवाय कॅनडा, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे.

मोठा दिलासा! मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं; लॅन्सेट रिसर्चमध्ये झाला खुलासा

अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहेत. या आजारात अँटीव्हायरल औषधे आराम देऊ शकतात, असं लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलं आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.
 

Web Title: Monkeypox outbreak cases updates argentina us belgium uk spain italy canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.