Monkeypox: 'मंकीपॉक्स'ची दहशत! शारीरिक संबंधांबाबत अमेरिकेची विचित्र गाइडलाइन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:07 PM2022-06-17T16:07:50+5:302022-06-17T16:08:22+5:30

मंकीपॉक्स शरीरावर झालेल्या जखमांना स्पर्श करून पसरतो. याशिवाय तो हवेतूनही पसरू शकतो.

Monkeypox panic! US CDC issues guidelines on sexual relations | Monkeypox: 'मंकीपॉक्स'ची दहशत! शारीरिक संबंधांबाबत अमेरिकेची विचित्र गाइडलाइन जारी

Monkeypox: 'मंकीपॉक्स'ची दहशत! शारीरिक संबंधांबाबत अमेरिकेची विचित्र गाइडलाइन जारी

Next

अमेरिका - यूरोप आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशात मंकीपॉक्स(Monkeypox) पसरत चालला आहे. मंकीपॉक्सच्या दहशतीमुळे अमेरिका एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशन(CDC) नं शारीरिक संबंधांबाबत विचित्र गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेला रुग्ण सेक्सद्वारे पार्टनरही संक्रमित करू शकतो असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे जो कोणी मंकीपॉक्स संक्रमित आहे त्यांनी संबंध ठेवण्यापासून दूर राहावं असा सल्ला दिला आहे. अशाप्रकारे अनेक रुग्ण समोर आल्यानं CDC नं मंकीपॉक्स संक्रमित रुग्णांसाठी गाइडलाईन्स जारी केली आहे. 

CDC गाइडलाइननुसार, मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीनं त्याच्या पार्टनरसोबत संपूर्ण कपडे घालून संबंध ठेवावेत. शरीरावरील प्रत्येक अंग झाकणे गरजेचे आहे. मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाने पार्टनरचे चुंबन घेऊ नये. त्याशिवाय सेक्सनंतर तातडीने दुसऱ्या पार्टनरने आंघोळ करावी, कपडे, चादर धुवावी. इतकेच नाही तर संक्रमित रुग्णांनी केवळ फोन सेक्सचा विचार करायला हवा असा विचित्र सल्ला CDC नं दिला आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणे काय? 
मंकीपॉक्स शरीरावर झालेल्या जखमांना स्पर्श करून पसरतो. याशिवाय तो हवेतूनही पसरू शकतो. एखाद्याला मंकीपॉक्स झाला तर लक्षणे दिसायला सुमारे दोन आठवडे लागतात. पहिली लक्षणे फ्लूसारखी असतील. यामध्ये संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवते. ही लक्षणे सुरू होताच, १-३ दिवसांत, शरीरावर पुरळ उठल्यासारखे दिसते. परंतु आकाराने. कधीकधी ते वेदनादायक आणि खाज सुटू शकतात. यापैकी काही किंवा सर्व लक्षणे दिसू शकतात.

हा विषाणू ४० देशांमध्ये पसरला 
बुधवारी, अमेरिकेत मंकीपॉक्सची १२ रुग्ण नोंदवली गेली. एका दिवसात दाखल झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत यूएसमध्ये नवीन रुग्णासह एकूण ८५ संख्या पोहचली आहे. त्याच वेळी, मंकीपॉक्स ४० देशांमध्ये पसरला आहे, ज्यामुळे सुमारे २००० लोक संक्रमित झाले आहेत.

मंकीपॉक्सचा फैलाव कसा झाला?
मंकीपॉक्सचा विषाणू डबल स्टँडर्ड आहे. संशोधकांच्या मते हा आजार उंदीर, खार, उंदराचे मांस इत्यादींपासून पसरतो. मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

Web Title: Monkeypox panic! US CDC issues guidelines on sexual relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.