"भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक; लष्कराचीही मदत घ्यावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:49 AM2021-05-07T10:49:57+5:302021-05-07T10:56:02+5:30
Coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण हा यावरीवल उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान भारतातील परिस्थितीत चिंताजनक असल्याचं मत जगातिल कोरोनाच्या जाणकारांपैकी असलेले दिग्गज Dr. ANTHONY FAUCI यांनी व्यक्त केलं. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागारदेखील आहेत. "भारताला मर्यादित कालावधीसाठी लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे. तसंच रुग्णालयांच्या उभारणीसाठी लष्कराचीही मदत घेतली पाहिजे. याशिवाय लसीकरण प्रक्रिया वेगवान केली पाहिजे," असं ते म्हणाले.
"कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात दोन ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणि लसीकरणात तेजी ही उपयुक्त ठरू शकते. देशात लष्कराच्या मदतीनं फिल्ड रुग्णालये उभारून संक्रमण थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. वैद्यकीय उपकरणे घेऊन अमेरिकादेखील भारताची मदत करत आहे," असंही ANTHONY FAUCI म्हणाले. CNN-News18 शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
परिस्थिती चिंताजनक
"भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा संसर्गही तेजीनं होत आहे. अमेरिकेतही एका दिवसात ३ लाख रुग्ण सापडले होते. भारतात त्वरित बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. लष्कराच्या मदतीनं रुग्णालये उभारली पाहिजे. गरजेच्या वेळी भारतानं अन्य देशांची मदत केली होती. आता अन्य देशांना भारताची मदत करायला हवी," असंही ते म्हणाले.
"जशी युद्धादरम्यान उभारली जातात तशी फिल्ड रुग्णालये उभारली पाहिजेत. जे लोक आजारी आहेत किंवा ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. सरकार हे पहिल्यापासूनही करतच आहे," असंही त्यांनी नमूद केलं.