फ्रान्समध्ये महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 04:25 AM2018-06-21T04:25:31+5:302018-06-21T04:25:31+5:30
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
पॅरिस : पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
विलेर्स ग्युसलेन हे ठिकाण पॅरिसपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. पहिल्या महायुद्धात नोव्हेंबर व डिसेंबर १९१७ मध्ये येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश सैन्यातील भारतीय घोडदळ फौजेने मोछा पराक्रम गाजवला होता. या लढाईत जेभारतीय सैनिक शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ आताच्या भारतीय लष्करातील जुन्या घोडदळ तुकड्या दरवर्षी ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर हे दिवस ‘कॅम्बराय डे’ म्हणून साजरा करतात. ९वी हॉडसन घोडतळ तुकडी, रॉयल डेक्कन हॉर्स (आताची ९वी डेक्कन हॉर्स), ३४ वी पूना हॉर्स (आताची १७ पूना हॉर्स), ३८ वी सेंट्रल इंडिया हॉर्स (आता सेंट्रल इंडिया हॉर्स) व १८ कॅव्हलरी या घोडतळ तुकड्यांमधील सैनिकांनी या युद्धात प्राणांची बाजी लावली होती.
धारातीर्थी प्राणाहुती देणाºया भारतीय सैनिकांचे भारताबाहेर बांधले जाणारे हे अशा प्रकारचे दुसरे स्मारक असेल. पहिले स्मारक फ्रान्समध्येच पॅस-द-कॅलेस येथे आहे. पहिल्या महायुद्धात तेथे झालेल्या लढाईत कामी आलेल्या ४,७४२ भारतीय सैनिकांच्या गौरवार्थ ते बांधण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)