Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:51 PM2023-02-07T16:51:42+5:302023-02-07T17:08:48+5:30

माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे.

Moon rhythm photo from Samsung mobile phone; Twitter owners are also surprised to see the video | Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

googlenewsNext

ट्विटर कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी एका मोबाईल फोनचं चांगलच कौतुक केलं आहे. Samsung कंपनीच्या लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन Galaxy S23 Ultra चा कॅमेरा पाहून मस्क इम्प्रेस झाले आहेत. यासंदर्भात एक ट्विट करुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गर्भश्रीमंत आणि ट्विटरमालकाची ही रिएक्शन पाहून अनेकांची त्या फोनबद्दल उत्सुकता वाढली आहे. मस्क यांनी ट्विटरवरुन Wow असे लिहून या फोनच कौतुक केलं.  

माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे. या व्हिडिओत Galaxy S23 Ultra... मोबाईलद्वारे 100x वर चंद्राचा फोटो क्लिक केल्यानंतर तो कसा दिसतो, हे त्यांनी दाखवून दिलंय. या ट्विटसोबत त्यांनी मेसेजही लिहिला आहे. मला नाही वाटत की, 100x वर चंद्राचा फोटो घ्यायची गरज आहे, पण, Galaxy S23 Ultra... हा स्मार्टफोन आपल्यासाठी आहे. या मेसेजसह त्यांनी चंद्राचा फोटो काढलेला व्हिडिओही शेअर केला आहे. 

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी या ट्विटला रिप्लाय केला असून wow अशा शब्दात कौतुक केलंय. यातून ते अधिक इम्प्रेस झाले आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमधून काढलेला फोटो अतिशय सुंदर आला असून ट्विटवर अनेक चाहत्यांनी फोटो आणि मोबाईलचं कौतुक केलंय. या फोनमध्ये 200 MP चा कॅमेरा असून यातून निघालेला फोटो अगदी प्रोफेशनल कॅमेरासारखाच आला आहे. 

 

Web Title: Moon rhythm photo from Samsung mobile phone; Twitter owners are also surprised to see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.