Coronavirus : अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू; सिनेटर रँड पॉलही संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:47 AM2020-03-23T10:47:34+5:302020-03-23T10:56:44+5:30
आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्क (114), वॉशिंग्टन (94) आणि कॅलिफोर्निया (28) जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.
वॉशिंग्टनः अमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात 24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयानं मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जारी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्क (114), वॉशिंग्टन (94) आणि कॅलिफोर्निया (28) जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.
अमेरिकेत जवळपास 30 हजार लोक या विषाणूनं संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे संक्रमित होणाऱ्यांमध्ये अमेरिकेच्या सिनेटर रँड पॉल यांचाही समावेश आहे. रविवारी केलेल्या चाचणीत रँड पॉल पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉल यांच्या ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली आहे. पॉल हे कोविड 19 विषाणूनं संक्रमित झाले आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. रँड पॉल हे कोरोनानं संक्रमित झालेले अमेरिकेतले पहिले सिनेटर आहेत.
पेशाने डॉक्टर असलेले पॉल म्हणाले की, सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत, परंतु बराच प्रवास करण्याबरोबरच इतर कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्यानं त्यांची खबरदारीसाठी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्कात आलो की नाही, याबाबत माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
coronavirus : मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी, 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू https://t.co/nY3FP1HOAz
— Lokmat (@MiLOKMAT) March 23, 2020
सगळ्यांची होणार चाचणी
रविवारी सकाळी पॉल आपल्या सहकारी कर्मचार्यांसह जिममध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकनच्या सिनेटरसमवेत दुपारचे जेवण केले होते. यात सामील असलेले सर्वजण घाबरलेले आहेत. सिनेटचे सदस्य असलेले जेरी मॉरॉन म्हणाले, "मी रविवारी पॉल जलतरण तलावात स्नान करत होते. सीएनएनच्या मते, पॉल यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी घेतली जाईल.
US Senator Rand Paul (file pic) has tested positive for #Coronavirus, reports AFP news agency quoting staff pic.twitter.com/wpvzfivCTq
— ANI (@ANI) March 22, 2020
अमेरिकेत पसरलं भीतीचं वातावरण
अमेरिकाही वाईट पद्धतीनं कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. व्यवसाय बंद झाले आहेत, लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. शाळा बंद आहेत आणि लोक घरात नजरकैद झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान आहे. कोरोना व्हायरस आणि लॉक डाउनबद्दल लोकांमध्ये भीती आहे. अमेरिकेतील लोकांनी बाजारपेठा रिकामी केल्या आहेत. कॅलिफोर्निया, इलिनॉय, न्यूयॉर्क आणि कनेक्टिकटमधील 5..5 दशलक्ष लोकांना वेगवेगळे राहण्याची सूचना देण्यात आली आहे. अमेरिकी सरकारनं काही नियम जारी केले असून, त्याचं उल्लंघन केल्यास लोकांकडून दंड आकारला जाणार आहे.