अमेरिकेत एका दिवसात दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:10 AM2021-01-06T01:10:26+5:302021-01-06T07:34:17+5:30
२४ तासांत १,६८१ जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाची स्थिती अमेरिकेत गंभीर होत चालली आहे. मागील २४ तासांत देशात १ लाख ६२ हजार ४२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तेथील एकूण बाधितांची आकडेवारी दोन कोटी सात लाखांहून अधिक झाली आहे. तर, मागील २४ तासांमध्ये १ हजार ६८१ जणांचे मृत्यू झाले आहेत.
न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे ३८ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला तर, टेक्सासमध्ये २८ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियातील २६ हजार ६६५ जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर, फ्लोरिडामध्ये २२ हजार जणांचा मृत्यू झाला.
कॅलिफोर्निया, कोलोराडो आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. अमेरिकेत सध्या फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत लसीकरणही सुरु आहे.
लसीला मंजुरी...
n फायझरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी जागतिक आरोग्य संघटनेने फायझर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे.
n जागतिक आरोग्य संघटनेकडून पहिल्यांदाच एखाद्या लसीला मान्यता मिळाली आहे. यामुळे अनेक देशांना ही लस वापरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
n याआधीच काही देशांनी फायझर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. सध्या ही लस अमेरिका आणि युरोपमध्येच उपलब्ध आहे.