अफगाणिस्तान हवाई दलाची मोठी कारवाई; २०० हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:07 PM2021-08-08T15:07:21+5:302021-08-08T15:08:15+5:30
हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
काबूल: गेल्या अनेक दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तानात मोठा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. यात दानिश सिद्दीकी या भारतीय पत्रकाराचीही हत्या करण्यात आली. अमेरिकेचे सैन्य मागे फिरल्यापासून तालिबानकडून अफगाणिस्तानच्या अनेक भागांवर ताबा मिळवला जात आहे. अफगाण सैन्य तालिबानला जोरदार प्रत्युत्तर देत असून, हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. (more than 200 terrorist taliban were killed in cheberghan city after Air Force air strike)
हवाई दलाकडून त्यांच्या सभा तसेच लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्या संख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहन नष्ट झाली, अशी माहिती अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार!
तालिबानी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई
अलीकडेच अफगाणिस्तान हवाई दलाने तालिबानवर मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने २५४ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास ९७ दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. अफगाण सैनिकांनी काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण १३ ठिकाणांवर एअरस्ट्राइक केल्याचे सांगितले जात आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गेल्या चार महिन्यात ५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास २४ हजार तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये २२ हजार हल्ले केले.