हैतीमध्ये चक्रीवादळाचे 300 हून अधिक बळी, अमेरिकेलाही जबर फटका
By Admin | Published: October 7, 2016 08:57 AM2016-10-07T08:57:08+5:302016-10-07T12:42:53+5:30
हैतीमधील हे चक्रीवादळ आता अमेरिकेतही दाखल झाले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रशासनाने आणीबाणी घोषित केली आहे.
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा दि. 7- कॅरेबियन देश हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळामुळे 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या चक्रीवादळामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हैतीमधील हे चक्रीवादळ आता अमेरिकेतही दाखल झाले आहे. या वादळाचा जबर फटका अमेरिकेलाही बसत आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रशासनाने आणीबाणी घोषित केली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने आधीच दक्षिण-पूर्व किना-यावरील जवळपास 30 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
अमेरिकेत 3,800 विमान उड्डाणे रद्द
चक्रीवादळामुळे येथील 3,862 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारपर्यंत येथील विमान सेवा बंद असणार आहे.
It dropped!!! #HurricaneMatthew#Mathew#florida#miamipic.twitter.com/gVjJBmoHyG
— Nat (@ndver6) October 6, 2016
विनाशकारी चक्रीवादळ
गेल्या दहा वर्षातील हे सर्वात शक्तीशाली आणि विनाशकारी चक्रीवादळ आहे. हे वादळ फ्लोरिडासाठी अतिधोकादायक मानले जात आहे, कारण उत्तेरकडील जोर्जिया आणि पुढील भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.
Última hora: Nace la tormenta Nicole - https://t.co/VtKLPtpGX6#Nicole#PrayForFlorida#UltimaHora#Florida#Miami#Mathew#HurricaneMatthewpic.twitter.com/ZA5NGSwglH
— Aquí Venezuela (@avenezuelanews) October 6, 2016
हैतीमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
मंगळवारी हैती आणि क्युबामध्ये मॅथ्यू चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे 80 टक्के घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सात लाखांपेक्षा जास्त नागरिक वादळामुळे प्रभावित झाले आहेत. याठिकाणी आता युद्धपातळीवर आता बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.