Corona Effect: CoronaVirus Effect: कोरोनामुळे असेही घडले, अनेकजण 'या' सवयीतून सुटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:00 PM2020-05-11T17:00:25+5:302020-05-11T17:08:37+5:30
कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी धुम्रपान करणेच सोडले आहे. कोरोनामुळे धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे YouGov केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
जगभरात कहर करणाऱ्या कोरोना विषाणूचा सा-यांनाच प्रचंड फटका बसला आहे.कोरोनामुळे लोक अनेक वाईट गोष्टींवर स्वतःहून निर्बंध लावत आहेत. आजपर्यंत जे शक्य नव्हते ते कोरोनामुळे झाल्याचे दिसून येते. ते म्हणजे अनेकांनी धुम्रापान करणेच सोडले आहे. होय, एरव्ही प्रत्येक बिडीच्या पाकीटावर 'स्मोकिंग इज इन्जुरस टू हेल्थ' असा इशारा दिल्याचे आपण नेहमीच पाहातो. थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी तंबाखू आणि धुम्रपान करणे किती हानीकारक आहे. यासंबंधी जाहिराती पाहतो. पण एखादी गोष्ट करू नका म्हटले की ती जास्त केली जाते. त्याचप्रमाणे धूम्रपानाचे आहे. आजपर्यंत अनेकदा धुम्रपानाने कशाप्रकारे मृत्यूला आमंत्रण देतो अनेकदा विविध पद्धतीने समजवले जाते. तरीही त्याचा फारसा परिणाम मात्र झालेला दिसत नाही.
काय तर म्हणे, कामाचा ताण असला की, स्मोकिंगने ताण कमी होतो, असेही अजब कारण सांगणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावर कोरोनामुळे नियंत्रण मिळविण्यास शक्य झाले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी धुम्रपान करणेच सोडले आहे. कोरोनामुळे धूम्रपानाचे प्रमाण कमी झाल्याचे YouGov ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
धूम्रपानामुळे फुफ्फुसांना हानी पोहोचते. कोरोना व्हायरसही श्वसनप्रणालीवर परिणाम करतो. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्याचा धसकाच जणू ब्रिटनमधील नागरिकांनी घेतला. त्यामुळे धुम्रपान करणा-यांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाली आहे. तसेच शिंकताना आणि खोकताना रूमाल तोंडावर ठेवणे अशा सवयी देखील नागरिकांना लागल्या आहेत. त्यामुळे अनेक वाईट सवयी देखील दूर झाल्या आहेत. ब्रिटनप्रमाणे इतर देशांमध्येदेखील असेच आनंदी चित्र पाहायला मिळत आहे.