America Tornado : हाहाकार! अमेरिकेतील 5 राज्यांत Tornado चक्रीवादळाचे थैमान; तब्बल 80 हून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 08:17 AM2021-12-12T08:17:44+5:302021-12-12T08:51:39+5:30

80 Dead As Tornadoes Flatten Entire Blocks In 5 US States : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे इतिहासातील सर्वात मोठं वादळ असल्याचं म्हटलं आहे.

More Than 80 Dead As Tornadoes Flatten Entire Blocks In 5 US States | America Tornado : हाहाकार! अमेरिकेतील 5 राज्यांत Tornado चक्रीवादळाचे थैमान; तब्बल 80 हून अधिक जणांचा मृत्यू

America Tornado : हाहाकार! अमेरिकेतील 5 राज्यांत Tornado चक्रीवादळाचे थैमान; तब्बल 80 हून अधिक जणांचा मृत्यू

Next

अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये Tornado चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळालं आहे. यामध्ये तब्बल 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे इतिहासातील सर्वात मोठं वादळ असल्याचं म्हटलं आहे. बायडेन यांनी प्रतिक्रिया देताना "ही एक शोकांतिका आहे आणि आम्हाला अद्याप किती लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे माहीत नाही. शोध आणि बचाव अधिकारी वेगाने बचावकार्य करत असून घराच्या ढिगाऱ्याखाली असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे." फक्त एकट्या केंटकीमध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बरेच जण मेणबत्ती कारखान्यात काम करत होते. 

इलिनोइसमधील एका गोडाऊनमध्ये कमीतकमी सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते ख्रिसमससाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून ऑर्डरची तयारी करत होते. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी "केंटकीच्या इतिहासातील सर्वात वाईट, सर्वात विनाशकारी आणि सर्वात घातक चक्रीवादळ आहे. आपण 100 हून अधिक लोक गमावू शकतो अशी भीती वाटत आहे. मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ही आपत्ती खूप मोठी आहे आणि मला ते शब्दात सांगणं खूप अवघड आहे" असं म्हटलं आहे. 

"चक्रीवादळाने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये माजवला हाहाकार"

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मेफिल्ड शहरातील मेणबत्त्या कारखान्यात छत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यांनी मध्यरात्रीपूर्वी आणीबाणी जाहीर केली होती. या वादळाने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे." तसेच महापौरांनी देखील भीषण परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसेच इमारती कोसळल्या असून घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. चक्रीवादळामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. 

 

Web Title: More Than 80 Dead As Tornadoes Flatten Entire Blocks In 5 US States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.