अधिक धोका त्याला श्वास घेण्यात अडथळा, तिला छातीत दुखते! पुरुष, स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 07:06 AM2023-08-30T07:06:26+5:302023-08-30T07:06:43+5:30

डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते.

More danger he obstructs breathing, she has chest pain! Heart attack symptoms are different in men and women | अधिक धोका त्याला श्वास घेण्यात अडथळा, तिला छातीत दुखते! पुरुष, स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी

अधिक धोका त्याला श्वास घेण्यात अडथळा, तिला छातीत दुखते! पुरुष, स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी

googlenewsNext

न्यूयॉर्क : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न असतात. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून धोका टाळता येतो, असा दावा अमेरिकेच्या स्मिड्ट इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या संशोधनात केला. आरोग्यविषयक नियतकालिक लॅन्सेटमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ५०% लोकांना हृदयविकाराच्या २४ तास आधी लक्षणे दिसतात. डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते. दोघांनाही धडधडणे आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवतात. 

अहवाल काय म्हणताे?
हृदयविकाराचा झटका आलेल्या ९० टक्के लोकांचा हॉस्पिटलबाहेर मृत्यू होतो. कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या सवयींत गडबड, ताणतणाव वाढल्याने हृदयविकारही वाढले आहेत.

नेमका कुणाला? 
संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका अधिक धोकादायक ठरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने धोका आणखी वाढतो. 
पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच वर्षांच्या आत मृत्यू, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका स्त्रियांमध्ये ४७% आढळून आला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३६% आहे. 
हृदयविकाराचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.

लक्षणे...
पुरुष

- छातीत दुखणे
- अस्वस्थता
- श्वास घेण्यास त्रास
- डावा हात, जबडा दुखणे
- मळमळ होणे

स्त्रिया
- श्वास लागणे, घाम येणे
- पाठ, मान, जबडा दुखणे
- छातीत जळजळ 
- चक्कर येणे, मळमळ

Web Title: More danger he obstructs breathing, she has chest pain! Heart attack symptoms are different in men and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.