मालीमध्ये सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, 73 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:59 PM2024-01-25T13:59:55+5:302024-01-25T14:18:41+5:30

माली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

More than 70 dead after informal gold mine collapsed in Mali, an official says | मालीमध्ये सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, 73 जणांचा मृत्यू

मालीमध्ये सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, 73 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश मालीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे सोन्याची खाण कोसळून आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते, ते आता थांबवण्यात आले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 73 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, माली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

वृत्तसंस्थेनुसार, मालीची गणना आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशांमध्ये केली जाते. मात्र, याठिकाणी सोन्याचे मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते. मालीमध्ये भूस्खलनामुळे खाण कोसळणे सामान्य आहे. मात्र, भूस्खलनामुळे खाण कोसळून मृत्यू झाल्याची इतकी मोठी घटना अनेक दिवसांनी घडली आहे. तर येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या दुर्घटनेनंतर माली सरकारने एक निवेदन जारी करून खाण कामगारांना आवाहन केले आहे. खाणकामात असलेल्या कामगारांना सुरक्षा उपकरणे पुरविली पाहिजेत, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, मालीमधील खाण क्षेत्रावर कॅनडाचे बॅरिक गोल्ड, बी2गोल्ड, ऑस्ट्रेलियाचे रिझोल्युट मायनिंग, ब्रिटनचे हमिंगबर्ड रिसोर्सेस यासह अनेक परदेशी कंपन्यांचा ताबा आहे. मालीमध्ये वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता असूनही या कंपन्या येथे खाणकाम सुरू ठेवतात.

दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात खाणकाम 
आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सोन्याचे साठे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते. इतकंच नाही तर वर्ल्ड ऑफ द गोल्ड सिटी देखील दक्षिण आफ्रिकेत आहे. विटवॉटरसँड नावाची ही खाण दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतात आहे, जिथे सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग आहे. जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी 40 टक्क्यांहून अधिक सोन्याचा साठा येथे आहे. टेकड्यांवर वसलेले जोहान्सबर्ग शहर सोन्याच्या खाणी खोदल्यामुळे वसले असे म्हणतात.
 

Web Title: More than 70 dead after informal gold mine collapsed in Mali, an official says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.