माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:21 AM2021-01-14T05:21:31+5:302021-01-14T05:21:51+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लागलेले अयोग्य निकाल बदलण्याकरिता लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीकडे कूच केले होते.
Next
वॉशिंग्टन : माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी मोठा हिंसाचार होईल, अशी धमकी त्या देशाचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांना दिली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील संसद इमारतीवर झालेल्या हल्ल्याबद्दल माफी न मागता ट्रम्प यांनी पुन्हा चिथावणीखोर भाषा सुरू केली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लागलेले अयोग्य निकाल बदलण्याकरिता लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीकडे कूच केले होते. ती कृती योग्यच होती, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले आहे.