भीषण! नायजेरियात मशिदीवर हल्ला; गोळीबारात इमामासह 12 जणांचा मृत्यू, अनेकांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:50 PM2022-12-05T12:50:36+5:302022-12-05T12:52:43+5:30

Mosque Attack In Nigeria : गोळीबारानंतर हल्लेखोरांनी मशिदीतूनच काही लोकांचे अपहरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

mosque attack in nigeria 12 people including imam killed many abducted | भीषण! नायजेरियात मशिदीवर हल्ला; गोळीबारात इमामासह 12 जणांचा मृत्यू, अनेकांचे अपहरण

भीषण! नायजेरियात मशिदीवर हल्ला; गोळीबारात इमामासह 12 जणांचा मृत्यू, अनेकांचे अपहरण

Next

नायजेरियामध्ये एक भीषण घटना घडली आहे. मशिदीवर हल्ला करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत नमाज अदा करणाऱ्या इमामासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या गोळीबारानंतर हल्लेखोरांनीमशिदीतूनच काही लोकांचे अपहरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नायजेरियात यापूर्वीही बंदुकधाऱ्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या टोळ्या लोकांची हत्या करतात किंवा खंडणीसाठी त्यांचे अपहरण करतात, अशी माहिती मिळत आहे. एवढंच नाही तर ही गँग गावकऱ्यांकडून शेतीसाठी 'प्रोटेक्शन मनी'ची मागणी करतात. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचे गृहराज्य असलेल्या काटसिना येथील फुंटुआ येथील रहिवासी लावल हारुना यांनी या घटनेची माहिती दिली. 

बंदुकधारी मोटारसायकलवरून मॅगमजी मशिदीत आले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फुंटुआचे आणखी एक रहिवासी अब्दुल्लाही मोहम्मद म्हणाले, "त्यानंतर त्यांनी अनेक लोकांना एकत्र केले आणि झुडपात नेले. अपहरण झालेल्या निरपराध लोकांना हल्लेखोरांनी सोडावे अशी मी प्रार्थना करत होतो."

काटसिना हे नायजेरियाच्या वायव्येकडील राज्यांपैकी एक आहे, जे शेजारच्या नायजरशी सीमा सामायिक करते. त्यामुळे दोन्ही देशांत ही गँग अगदी सहज वावरते. नायजेरियामध्ये, लष्कराने हल्लेखोरांकडून वापरल्या जाणार्‍या जागेवर बॉम्बफेक केली आहे, परंतु हल्ले अजूनही सुरू आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mosque attack in nigeria 12 people including imam killed many abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.