मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार

By admin | Published: September 17, 2016 04:13 AM2016-09-17T04:13:39+5:302016-09-17T10:40:02+5:30

पेशावरच्या वायव्येकडील आदिवासीबहुल भागातील मशिदीमध्ये मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणला. त्यात २५ जण ठार झाले असून, २९ जण गंभीर जखमी झाले आहे

Mosque blasts; 25 killed | मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार

मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार

Next

पेशावर : पेशावरच्या वायव्येकडील आदिवासीबहुल भागातील मशिदीमध्ये मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणला. त्यात २५ जण ठार झाले असून, २९ जण गंभीर जखमी झाले आहे. स्वत:च्या शरीरात दडवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यापूर्वी त्या इसमाने ‘अल्ला हो अकबर’ असे नारेही दिले. अफगाणिस्तानला लागून असलेल्या अनबीर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मशिदीत शुक्रवारी दुपारी २ वाजता नमाज पढला जात असतानाच हा आत्मघाती हल्ला झाला. बॉम्बस्फोटामुळे जमलेल्या लोकांची धावपळ झाली. प्रत्येक जण मशिदीतून बाहेर पडू लागल्याने चेंगराचेंगरीही झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mosque blasts; 25 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.