पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 07:07 AM2024-09-18T07:07:43+5:302024-09-18T07:08:21+5:30
लेबनॉनमधील पेजर बॉम्बस्फोटात हजारो लोक जखमी झाले आहेत, यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. ज्या पेजर्समध्ये बॉम्बस्फोट झाले ते नुकतेच हिजबुल्लाहने खरेदी केल्याचा दावा केला जात आहे.
लेबनॉनमध्ये पेजरच्या एका पाठोपाठ साखळी बॉम्बस्फोटात १२०० जण जखमी तर अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे लेबनॉनमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटासाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे. डिव्हाइस हॅकिंग आणि इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि पेजर उपकरणे बनवणारी कंपनी यांच्यातील संबंधाच्या दाव्यांसह अनेक दावे केले जात आहेत.
दरम्यान, ज्या पेजर्समध्ये बॉम्बस्फोट झाले ते नुकतेच खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली पाळत ठेवण्यापासून वाचण्यासाठी हिजबुल्लाचे लढवय्ये पेजरसारख्या प्रणालीचा वापर करतात.
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये स्फोट झालेले पेजर अल्फान्यूमेरिक आहेत. स्फोट झालेल्या पेजरची लेबले तैवानच्या कंपनीशी मिळतीजुळती आहेत अशी माहिती समोर आली आहे. हे पेजर काही दिवसापूर्वीच हिजबुल्लाहने खरेदी केले होते.
पेजर स्फोटाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावेही केले जात आहेत. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये हा सायबर हल्ला असल्याचे म्हटले आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
या स्फोटाबाबत हिजबुल्लाकडून एक विधानही समोर आले आहे, यामध्ये त्यांनी इस्रायलला जबाबदार धरले आहे आणि कटाचा आरोप केला आहे. स्थानिक आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिजबुल्ला याला स्वतःसाठी एक मोठा धोका म्हणून पाहत आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरक्षा त्रुटी मानत आहे. या दुर्घटनेनंतर त्यांनी आपल्या सैन्याला पेजर न वापरण्याचा सल्ला दिला आहे .
बॉम्बस्फोट मालिकेनंतर असे अनेक दावे केले जात आहेत, मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या स्फोटावरील आरोप ना इस्रायलने फेटाळले आहेत ना हिजबुल्लाने आपल्या दाव्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले आहेत. वास्तविक, हे देखील अनुमान आहे कारण अलीकडच्या काही महिन्यांत इस्रायलने लेबनॉन आणि इराणसह आसपासच्या अनेक देशांमध्ये हल्ले केले आहेत, ज्यामध्ये हमास प्रमुख इस्माइल हनीह यांच्या मृत्यूचा प्रश्न देखील आहे.
या घटनेबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही, या स्फोटावरील आरोप ना इस्रायलने फेटाळले आहेत ना हिजबुल्लाने कोणतेही पुरावे दिले आहेत.मागील काही महिन्यांत इस्रायलने लेबनॉन आणि इराणसह आसपासच्या अनेक देशांमध्ये हल्ले केले आहेत.