सर्वात खतरनाक खूनी, ज्याला अंडरग्राऊंड तुरूंगात काचेच्या बॉक्समध्ये केलं कैद, त्याचा शेवटही तिथेच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:25 PM2021-12-27T13:25:25+5:302021-12-27T13:26:12+5:30

Most dangerous serial killer kept in glass box : 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, १९७४ आणि १९७८ दरम्यान चार लोकांची हत्या करणाऱ्या रॉबर्ट मौडस्लेला तुरूंगात भूमिगत सेलमध्ये ठेवलं जाणार आहे.

Most dangerous serial killer kept in glass box underground jail will die in prison | सर्वात खतरनाक खूनी, ज्याला अंडरग्राऊंड तुरूंगात काचेच्या बॉक्समध्ये केलं कैद, त्याचा शेवटही तिथेच होणार

सर्वात खतरनाक खूनी, ज्याला अंडरग्राऊंड तुरूंगात काचेच्या बॉक्समध्ये केलं कैद, त्याचा शेवटही तिथेच होणार

googlenewsNext

ब्रिटनमधील सर्वात खरतनाक सीरिअल किलरपैकी एक ६८ वर्षीय रॉबर्ट मौडस्ले (Robert Maudsley) चा मृत्यू एका भूमिगत काचेच्या बॉक्समध्ये होणार. रॉबर्टला त्याची पुढील शिक्षा तुरूंगात एकट्यात भोगावी लागणार आहे. त्याची इतर कैद्यांसोबत राहण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, १९७४ आणि १९७८ दरम्यान चार लोकांची हत्या करणाऱ्या रॉबर्ट मौडस्लेला तुरूंगात भूमिगत सेलमध्ये ठेवलं जाणार आहे. रॉबर्टला याच आठवड्यात सांगण्यात आलं की, जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत त्याला ग्लास बॉक्समध्ये कैद करून ठेवलं जाणार आहे.

रॉबर्टला तुरूंगातील इतर कैद्यांसोबत ख्रिसमस साजरा करायचा होता. पण त्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. तुरूंगाच्या अधिकाऱ्यांनी त्याचं वेस्ट यॉर्कशायर तुरूंगातील कैद्यांना भेटणं आणि गार्ड्सना भेटणं फार खतरनाक असल्याचं म्हटलंय. सोबतच सांगितलं की, रॉबर्ट बऱ्याच वर्षांपासून एकटा राहत आहे. त्यामुळे ते जोखिम घेऊ शकत नाही.

भूमिगत काचेच्या बॉक्समध्ये होईल त्याचा मृत्यू

लिवरपूलच्या रॉबर्टी अखेरची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर आता त्याला त्याच्या उरलेल्या आयुष्याचे दिवस ५.५ बाय ४.५  मीटर सेलमध्ये घालवावे लागतील. हा सेल खासकरून त्याच्यासाठी १९८३ मध्ये बनवण्यात आला होता.  हा सेल बुलेटप्रूट ग्लासपासून तयार करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, तो दररोज २३ तास याच काचेच्या सेलमध्ये घालवत आहे. तो क्रॉंक्रीटच्या फरशीवर झोपतो आणि एका टॉयलेट-सींकचा वापर करतो. सेलमध्ये एक खुर्चीही आहे. 

रॉबर्ट २१ वर्षांचा असताना त्याने पहिली हत्या केली होती. यानंतर त्याच्यावर हत्या, लहान मुलांचं शोषण, पत्नीची हत्यासहीत अनेक केस आहेत. ज्यात तो दोषी आढळून आला. कधी त्याने चाकूने हत्या केली तर कधी शिर धडापासून वेगळं केलं. तो १९८३ पासून सेलमध्ये आहे. इथे त्याची खतरना वागणूक बघून त्याला भूमिगत काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलं. आता त्याला अखेरच्या श्वासापर्यंत तिथेच रहावं लागणार आहे.
 

Web Title: Most dangerous serial killer kept in glass box underground jail will die in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.