भयंकर! मुलीच्या कौमार्याचा आईनेच केला 17 लाखांत सौदा, पोलिसांनी केला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:55 AM2018-01-21T08:55:11+5:302018-01-21T12:55:03+5:30

या महिलेने एका श्रीमंत व्यापाऱ्याशी मुलीचा सौदाही पक्का केला होता. ती मुलीला घेऊन विमानाने गेली होती, मात्र

mother-admits-trying-to-sell-13-year-old-daughters-virginity-for-17-lacks-rupees-to-a-rich-businessman-in-russia | भयंकर! मुलीच्या कौमार्याचा आईनेच केला 17 लाखांत सौदा, पोलिसांनी केला भांडाफोड

भयंकर! मुलीच्या कौमार्याचा आईनेच केला 17 लाखांत सौदा, पोलिसांनी केला भांडाफोड

Next

मॉस्को -  आई आणि मुलीचे नाते हे अगदी वेगळे आणि तेवढेच सुंदर असते. त्याचे कारण म्हणजे मुलीवर आईचे जेवढे अधिक प्रेम असते. पण आईच आपल्या पोटच्या मुलीचा सौदा करते त्यावेळी त्या मुलीच्या मनावर काय बेतलं असेल याची कल्पनाच करवत नाही. आईच आपल्या पोटच्या मुलीच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना रशियामध्ये पोलिसांनी उघड केली. रशियामध्ये आपल्या स्वतःच्या मुलीचे कौमार्य 17 लाख रुपयांत विकू पाहणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून तिला ताब्यात घेतले.

रशियात घडलेल्या या घटनेत या महिलेने एका श्रीमंत व्यापाऱ्याशी सौदाही पक्का केला होता. ती मुलीला घेऊन विमानाने चेल्याबिंस्क येथून मॉस्कोला गेली होती, मात्र ती मुलीला सोपविणार त्यापूर्वीच स्थानिक पोलिसांनी तिला अटक केली. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली.

या महिलेचे नाव इरीना ग्लैडकिख असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती 35 वर्षांची असून ती बांधकाम व्यावसायिक आहे. आरोपी महिला आणि तिची मैत्रिण अल्पवयीन मुलीला घेऊन विमानाने गेली होती. मात्र तिला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्तहेराच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले. रशियाच्या गृह मंत्रालयाने या बाबत व्हिडियो मुख्य आरोपीच्या चौकशीचा एक व्हिडियोही प्रसिद्ध केला आहे. त्यात ती मुलीला घेऊन मॉस्कोला घेऊन गेल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. 

Web Title: mother-admits-trying-to-sell-13-year-old-daughters-virginity-for-17-lacks-rupees-to-a-rich-businessman-in-russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.