भयंकर! जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 07:52 PM2020-12-02T19:52:44+5:302020-12-02T19:56:28+5:30
Mother Kept His Son in Captivity: जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाला तब्बल 29 वर्षे कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जगभरातील अनेक देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाला तब्बल 29 वर्षे कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका आईने आपल्या मुलाला तो 12 वर्षांचा असतानाच एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं होतं. आता त्या मुलाचं वय 41 वर्षे झालं आहे. मुलगा अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना देखील संशय आला होता. त्यांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांना जेव्हा समजलं की मुलाला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं आहे. तेव्हा त्यांनी रुमचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढलं.
बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार आणणार नवीन कायदा https://t.co/ZTThLN1enP#Pakistan#Rape#ImranKhan
— Lokmat (@MiLOKMAT) November 25, 2020
डॉक्टरांना देखील बोलावण्यात आले. स्वीडिश मीडिया रिपोर्टनुसार, मुलगा एका खोलीत बंदिस्त असल्याने कुपोषणाचा शिकार झाला आहे. त्याच्या पायावर अनेक जखमा पाहायला मिळाल्या आहेत. तसेच सर्वच दात तुटले आहेत. हा मुलगा त्यामुळे बोलू शकत नाही आणि चालू देखील शकत नाही. नातेवाईकांनी तातडीने मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आईला अटक करण्यात आली आहे.
मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची सर्जरी देखील करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुलगा 12 वर्षांचा असताना त्याचं नाव शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला गेली 29 वर्षे घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. या महिलेने मुलाच्या अतिकाळजीपोटी त्याला कोंडून ठेवले असावे अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पीडित महिलेच्या नातवाने न्यायालयात दाखल केला होता खटला, तीन वर्षांनंतर दोषीला शिक्षा https://t.co/bJ25vSxJ85#MeeruRapeVerdict#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) November 23, 2020