आईनेच दिले मुलीला गर्भाशय

By admin | Published: November 27, 2015 12:25 AM2015-11-27T00:25:42+5:302015-11-27T00:25:42+5:30

जन्मदाती आई मुलांसाठी काय नाही करत? आईचे हे दातृत्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच दिसून येते. चीनमधील या महिलेने आपल्या मुलीसाठी गर्भाशय देत आईच्या दातृत्वाला नवे परिमाण दिले आहे.

The mother gave the uterus to the uterus | आईनेच दिले मुलीला गर्भाशय

आईनेच दिले मुलीला गर्भाशय

Next

बीजिंग : जन्मदाती आई मुलांसाठी काय नाही करत? आईचे हे दातृत्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच दिसून येते. चीनमधील या महिलेने आपल्या मुलीसाठी गर्भाशय देत आईच्या दातृत्वाला नवे परिमाण दिले आहे.
शियानच्या शिजिंंग हॉस्पिटलमध्ये रोबोटच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे संचालक चेन बिलियांग यांनी सांगितले की, या शस्त्रक्रियेत ३८ चिकित्सक सहभागी झाले होते. या हॉस्पिटलचे उपाध्यक्ष ली शियाओकांग यांनी सांगितले की, चीनमधील हे पहिले गर्भाशय प्रत्यारोपण आहे. गर्भाशय दान करणारी महिला आणि तिची २२ वर्षीय मुलगी यांची प्रकृती स्थिर आहे.
गर्भाशय प्रत्यारोपणाबाबत अनेक वर्षांपासून संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. अमेरिकेत १९६० च्या दशकात प्राण्यांवर प्रथम प्रयोग करण्यात आले. जगात सर्वात प्रथम सौदी अरेबियात २००० मध्ये मानवी गर्भाशयाचे प्रत्यारोपण झाले होते. दरम्यान, चीनमधील या प्रत्यारोपणानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.(वृत्तसंस्था)

काही तज्ञांच्या मते या प्रत्यारोपणात मोठ्या प्रमाणात धोकेही आहेत, तर काही तज्ञ म्हणतात की, या प्रत्यारोपणामुळे त्या महिलांना पर्याय मिळाला आहे ज्या काही कारणास्तव मुलांना जन्म देऊ शकत नाहीत.

Web Title: The mother gave the uterus to the uterus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.