आई मुलीसोबत गेली हनिमूनला; पुढे जे घडलं ते वाचून धक्का बसेल तुम्हाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:38 PM2020-01-20T17:38:39+5:302020-01-20T17:40:01+5:30
चक्रावून टाकणारी घटना १० वर्षांनंतर समोर
लंडन: आई आपल्या मुलांसाठी काहीही करते. लेकरांसाठी ती आयुष्यभर खस्ता खाते. आपल्याला आयुष्यात जे सुख मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी आई कष्ट घेते. मुलांच्या डोळ्यात अश्रू आले की आईलाही दु:ख होतं. आई आणि तिच्या लेकरांचं नातं शब्दांत व्यक्त करता येणं तसं कठीणच. मात्र या सगळ्याला छेद देणारी एक घटना लंडनमध्ये घडली. एका आईनं तिच्याच लेकीचा संसार मोडला. mirror.co.uk नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
लंडनच्या ट्विकेनहॅममध्ये राहणाऱ्या लॉरन वॉल नावाच्या तरुणीनं १० वर्षांपूर्वी पॉल नावाच्या तरुणाशी लग्न केलं. १० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेबद्दल लॉरेन आता व्यक्त झाली. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात पॉलनं घर सोडलं. यामुळे लॉरनला मोठा धक्का बसला. पॉल आपल्याच आईसोबत राहत असल्याची माहिती लॉरनला काही नातेवाईकांकडून समजली. त्यामुळे तिला आणखी जबरदस्त मानसिक हादरा बसला. आपली आई असं वागेल, याची तिला जराही कल्पना नव्हती.
लॉरन आणि पॉलच्या लग्नात लॉरनची आई ज्युलीनं जवळपास १४ लाख रुपये खर्च केले. त्यामुळे लॉरेन अतिशय आनंदी होती. त्यामुळे ती आईलादेखील हनिमूनला घेऊन गेली. हनीमूनवरुन परतल्यानंतर ज्युली आणि पॉल सोबत राहू लागले. आईनं विश्वासघात करुन संसार मोडल्यानं लॉरेनला धक्का बसला. यानंतर काही महिन्यांतच ज्युली यांनी एका मुलाला जन्म दिला.
काही वर्षांनी ज्युली आणि पॉल यांनी लग्न केलं. दोघांच्या विवाहाला लॉरेनदेखील हजर होती. घडलेल्या प्रकारात आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा ज्युली यांनी सुरुवातीला केला. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:ची चूक मान्य केली. पण पॉलनं कधीही लॉरेनची माफी मागितली नाही. आई आणि नवऱ्यानं केलेल्या विश्वासघातामुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही आईला माफ करणार नाही, अशा शब्दांत लॉरेननं तिच्या भावना व्यक्त केल्या.