मदर तेरेसा यांना ‘संत’पद मिळणार

By admin | Published: March 16, 2016 08:40 AM2016-03-16T08:40:20+5:302016-03-16T08:40:20+5:30

गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Mother Teresa will get the 'Sant' title | मदर तेरेसा यांना ‘संत’पद मिळणार

मदर तेरेसा यांना ‘संत’पद मिळणार

Next

व्हॅटिकन सिटी : गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

असा होता तेरेसा यांचा जीवनप्रवास
- तेरेसा यांचा जन्म १९१०मध्ये मॅसिडोनियात झाला होता. त्यांचे आई-वडील हे अल्बानियाचे होते.
- मदर तेरेसा यांना १९७९मध्ये नोेबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- कोलकात्यात मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या मदर तेरेसा यांचे १९९७मध्ये ८७व्या वर्षी निधन झाले.
- पोप फ्रान्सिस यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये मदर तेरेसा यांच्या दुसऱ्या चमत्काराला मान्यता दिली होती.

Web Title: Mother Teresa will get the 'Sant' title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.