आईच्या भावनेचा आवेग, पण सावधगिरीचा लगाम; नर्स मुलगी ड्यूटीहून परतताच अंगावर चादर टाकून घेतली गळाभेट अन् म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 10:12 AM2020-04-11T10:12:40+5:302020-04-11T10:21:34+5:30
येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली होती.
वॉशिंग्टन : म्हणतातना आईच्या भावनेची तुलना जगात कशाशीही आणि कधीही होऊ शकत नाही. एकीकडे संपूर्ण जगात कोरोना व्हायरस हाहाकार घालत आहे. तर दुसरीकडे या व्हायरसचे संक्रमण होऊ नये, म्हणून लोक वेगवेगळे उपाय करतानाही दिसत आहेत. मात्र, असे असतानाच आईच्या मायेचे एक सुंदर दृष्य अमेरिकेत बघायला मिळाले.
येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली. यावेळी आई चेरिल नॉर्टन सुरूवातीला तर तिच्याकडे दुरूनच पाहत उभ्या होत्या. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी जवळ असलेली एक चादर घेतली आणि त्या चादरीत आपल्या मुलीला पूर्णपणे गुढाळून त्यांनी तिला मिठी मारली आणि त्यांचा हुंदका फुटला.
...असे माझ्या मुलीसोबतही होऊ नये, हीच माझी इच्छा होती -
या घटनेनंतर चेरिल म्हणाल्या, जवळपास एक महिना ती माझ्यापासून दूर होती आणि जेव्हा मला तिला पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा ती पूर्णपणे बरी आहे, की नाही, हे मला जाणून घ्यायचे होते. तिला पाहता क्षणी पळत जाऊन मिठी मारायची माझी इच्छा होती. मात्र, सुरक्षितताही तेवढीच आवश्यक होती. मी तत्काळ लॉन्ड्रीच्या बॅगेतून एक चादर काढली आणि केल्सीला त्यात गुंढाळून छातीशी लावले. मी सोशल मीडिवर बघत आहे, की अनेक आरोग्य कर्मचारी स्वतःला एकटे-एकटे समजत आहेत. मात्र, असे माझ्या मुलीसोबत होऊ नये, अशी माझी इच्छा होती.
हा एक सुंदर अनुभव होता - केल्सी
या प्रसंगावर बोलताना केल्सी म्हणाली, ‘मी गरज पडली, की कार घरी पाठवायचे आणि आई-बाबा आवश्यक साहित्य पाठवून द्यायचे. अशा पद्धतीने आईने गळाभेट घेणे हे माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. हा अत्यंत सुंदर अनुभव आहे.'