‘माऊंट एव्हरेस्ट’च ‘टॉलेस्ट’, ८६ सेंटिमीटरने वाढली उंची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 05:14 AM2020-12-09T05:14:13+5:302020-12-09T05:16:43+5:30
Mount Everest News : जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्यात आली आहे.
जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्यात आली आहे. २०१५ मध्ये नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरले होते. या नैसर्गिक संकटामुळे भूगर्भात बरीच उलथापालथ झाल्याने एव्हरेस्ट शिखराची आताची सर्वमान्य उंची कायम राहिली असेल की नाही, या शंकेने नेपाळ सरकारला घेरले. त्यातूनच एव्हरेस्टची उंची नव्याने मोजण्याचे काम तेथील सरकारने हाती घेतले. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून चीनच्या साह्याने काम सुरू होते. आता एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याचे त्यातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला एव्हरेस्ट शिखराचा वेध...
भारतीय व युरेशियन भूस्तराच्या टकरीतून एव्हरेस्टची निर्मिती
१९५४ मध्ये ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने ही उंची निश्चित केली होती
०.५ मीटर दर १०० वर्षांनी वाढणारी एव्हरेस्टची उंची
५० दशलक्ष वर्षे जुने शिखर
के२ : दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर
(हे शिखर चीन व पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर आहे)
युरोपमधील सर्वोच्च शिखरे
माऊंट एल्ब्रस : ५,६४२ मीटर, कॉकेशस पर्वतराजीत स्थान
मॉण्ट ब्लांक : ४,८०८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान
माऊंट मॅटरहॉर्न : ४,४७८ मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान
जगातील सर्वात लहान शिखर : माऊंट विचप्रूफ, ऑस्ट्रेलिया (१४८ मीटर)