कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजेंटचा खात्मा; अज्ञातांनी घातल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:03 IST2025-03-08T14:01:17+5:302025-03-08T14:03:11+5:30

तो पाकिस्तानातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचा.

Mufti Shah Mir, a Pakistan-backed terrorist who helped ISI in abducting Kulbhushan, was shot in Turbat | कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजेंटचा खात्मा; अज्ञातांनी घातल्या गोळ्या

कुलभूषण जाधव यांना पकडून देणाऱ्या ISI एजेंटचा खात्मा; अज्ञातांनी घातल्या गोळ्या

 इस्लामाबाद - पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI च्या नापाक खेळीचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने मोठमोठ्या गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांना त्यांचं एजेंट बनवून भारताविरोधात कट रचण्याचा प्रयत्न करत असतात. आयएसआयचा असाच एक म्होरक्या मुफ्ती शाह मीर याला अज्ञात हल्लेगोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे. मुफ्ती शाह मीर याची भारतीय अधिकारी कुलभूषण जाधवच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जाते. 

बलूचिस्तानच्या तुरबत परिसरात राहणाऱ्या मुफ्ती शाह मीर आयएसआयच्या इशाऱ्यावर बेकायदेशीरपणे लोकांना एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याचं काम करतो. याच आड तो ड्रग्स आणि हत्यारांची तस्करीही करत होता. मुफ्ती शाह मीर पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी ट्रेनिंग सेंटरमध्ये ये जा करायचा. त्याचे आणखी एक काम होते, तो पाकिस्तानातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचा. मुफ्ती शाह मीरने ISI च्या सांगण्यावरून अफगाणिस्तानातही त्याचा तळ ठोकला होता. तो स्वत:ला एक दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात वावरायचा आणि गुप्त माहिती पाकिस्तानी फौजेला द्यायचा. 

बलूचिस्तान इथं सुरू असलेल्या चळवळीत जे पाकिस्तानातून स्वातंत्र्य मागतायेत त्या लोकांची माहिती आयएसआयला द्यायचा. मीर शाहच्या माहितीच्या आधारे अलीकडेच पाकिस्तानी लष्कराने या चळवळीवर नेत्यांवर कारवाई केली होती. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय अशी कारवाई करणे अशक्य होते. पाकिस्तानी सैन्याच्या या कारवाईमुळे चळवळीतील मोठी खळबळ माजली होती. 

शाह मीरला कुणी मारलं?

पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईनंतर जेव्हा शोधाशोध सुरू झाली तेव्हा चळवळीतील कार्यकर्त्यांना आपल्यातच कुणीतरी विश्वासघातकी असल्याचं कळलं, त्यात मीर शाह नाव पुढे आले. तेव्हापासून मुफ्ती मीर शाह टार्गेटवर होता. मुफ्ती मीर शाह तुरबत परिसरात एका मशि‍दीतून नमाज पठण करून बाहेर पडणारच इतक्यात अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मीर शाहची हत्या करून ते पसार झाले. सध्या पाकिस्तानी पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 

Web Title: Mufti Shah Mir, a Pakistan-backed terrorist who helped ISI in abducting Kulbhushan, was shot in Turbat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.