'गेम' फिरला ! बांगलादेशचे सरकार चालवणारे मुहम्मद युनूस स्वत:च्याच खेळीत अडकल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:46 IST2025-02-19T18:45:57+5:302025-02-19T18:46:59+5:30

Muhammad Yunus Bangladesh: शेख हसिना यांचे सरकार बरखास्त होऊन अनेक महिने लोटले, तरीही बांगलादेशात गोंधळ सुरुच आहे.

Muhammad Yunus led government facing rage from Bangladesh students injured protesters and BNP political party | 'गेम' फिरला ! बांगलादेशचे सरकार चालवणारे मुहम्मद युनूस स्वत:च्याच खेळीत अडकल्याची चर्चा

'गेम' फिरला ! बांगलादेशचे सरकार चालवणारे मुहम्मद युनूस स्वत:च्याच खेळीत अडकल्याची चर्चा

Muhammad Yunus Bangladesh: बांगलादेशातील शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारच्या सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांना अंतरिम काळजीवाहू सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. बांगलादेशात निवडणुका ( Bangladesh Elections ) घेण्याची आणि लोकशाही पुन्हा स्थापित करण्याची जबाबदारी युनूस यांच्यावर देण्यात आली. पण सध्याच्या स्थितीता बांगलादेशात घडत असलेल्या घडामोडी पाहता, युनूस हे स्वत:च्याच खेळीत अडकत चालले आहेत अशी चर्चा रंगली आहे.

विद्यार्थ्यांनी सुरु केला युनूस यांचा विरोध

एकीकडे जुने सहकारी युनूस यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणी करत आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय गुंतागुंतीमुळे निवडणुका लवकर होतील असे वाटत नाही. तशातच आता विद्यार्थ्यांनीही युनूस यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. जुलै २०२४ मध्ये, शेख हसीना यांचे मजबूत सरकार विद्यार्थ्यांनी पाडले होते. शेख हसीना यांच्यानंतर युनूस यांना सर्वोच्च नेते बनवण्यात आले, परंतु बांगलादेशात विद्यार्थी पुन्हा सक्रिय झाले आहेत. बांगलादेशच्या केयूईटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला आहे.

बांगलादेश सरकारने घाईघाईत कुलगुरूंवर कारवाई करण्याबद्दल भाष्य केले. पण विद्यार्थी नेते महफूज आलम यांनी सरकारने विद्यार्थ्यांबाबत संतुलित भूमिका घेण्याची मागणी केली आहे. महफूज म्हणतात की लोकांना राजकीय प्रणालीत सहभाग नोंदवता येईल अशी व्यवस्था करा. बांगलादेशच्या KUET विद्यापीठाने विद्यार्थी राजकारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय आता सरकारच्या भूमिकेपुढे फिका पडण्याची शक्यता आहे.

आंदोलनातील जखमी लोकही झाले आक्रमक

जुलै २०२४ च्या आंदोलनात जखमी झालेले लोकही आता युनूस सरकारविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत. बुधवारी, आंदोलनात जखमी झालेल्यांनी सरकारविरुद्ध निदर्शने केली. पीडितांचे म्हणणे आहे की अंतरिम सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात. द डेली स्टारच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने जखमींच्या तीन श्रेणी तयार केल्या आहेत. श्रेणी अ आणि श्रेणी ब मधील लोकांना तात्काळ मदत मिळते, परंतु श्रेणी क साठी कोणतीही मदत नाही. जखमींचे म्हणणे आहे की, जखमींना एकाच श्रेणीत ठेवले पाहिजे आणि त्यांना भत्ता देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

'बीएनपी'नेही युनूस सरकारला केले लक्ष्य

बीएनपी सध्या बांगलादेशातील सर्वात मोठा पक्ष आहे. हा पक्ष सध्या युनूस सरकारवर टीका करत आहे. लवकर निवडणुका न घेतल्याबद्दल बीएनपी युनूसवर सतत शाब्दिक हल्ला चढवत आहे. तसेच बीएनपीने डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदतही दिली आहे.

Web Title: Muhammad Yunus led government facing rage from Bangladesh students injured protesters and BNP political party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.