16 वर्षांच्या प्रियकराने बेडरूममध्येच केली प्रेयसीची डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 14:13 IST2018-07-14T14:07:17+5:302018-07-14T14:13:44+5:30
कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला.

16 वर्षांच्या प्रियकराने बेडरूममध्येच केली प्रेयसीची डिलिव्हरी
(Image Credit: www.mirror.co.uk)
काउंटी डरहम : नॉर्थ ब्रिटेनच्या काउंटी डरहम शहरात फेसबुकवरून 31 वर्षीय महिलेचं आणि 16 वर्षांच्या मुलांचं प्रेम जुळलं. नंतर महिला आणि तरुणाने 7 महिन्यांच्या प्रेम संबंधानंतर बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर या दोघांच्या बाळाची या तरूणाने घरीच डिलेव्हरी केली.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये फेसबुकवरून ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला.
कॅथलीनचं याआधी लग्न झालं होतं. या लग्नातून तिला 2 अपत्ये आहेत. असे असूनही वयाने तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरूणासोबत नातं ठेवण्यात तिला काहीही समस्या नव्हती. कॅथरीनने सांगितलं की, सुरुवातीला आम्ही फेसबुकवर चॅटिंग करायचो. नंतर आम्ही भेटलो आणि आमचं अफेअर सुरु झालं. जेव्हा मी प्रेग्नंट होण्याचा विषय जॅककडे काढला तेव्हा त्याने यात मला साथ देण्याचा निर्णय घेतला.
कॅथलीनने पुढे सांगितले की, 'जॅकने बाळाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. आमचं बाळ बेडरूममध्ये जन्माला आलं याच्या मागेही एक मजेदार किस्सा आहे. मला कळा येत असल्याने मी 5 वेळा हॉस्पिटलमध्ये गेले. पण प्रत्येकवेळी ड्यू डेट नसल्याकारणाने मला परत पाठवण्यात आलं. पाचव्यांदा हॉस्पिटलमधून परत आल्यावर मला पोटात वेदना होऊ लागल्या होत्या. जॅकने हॉस्पिटलला फोन केला आणि काही अनुचित घडू नये म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याने माझी डिलेव्हरी केली'.
जॅक आणि कॅथलीन यांचं बाळ आता 9 महिन्यांचं झालं आहे. तर जॅकही आता 18 वर्षांचा झाला आहे. कॅथलीनला आधीच्या लग्नातून दोन मुलं आहेत. कॅथलीनचा मोठा मुलगा केवळ 5 वर्षांचा आहे. ती सांगते की, आमच्या परिवारात वय महत्वाचं नाहीये. आम्ही आनंदाला महत्व देतो. जॅकचं आणि माझ्या मुलांचं चांगलं बॉंडिंग आहे.