मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

By admin | Published: December 29, 2014 12:05 PM2014-12-29T12:05:30+5:302014-12-29T12:05:30+5:30

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाक न्यायालयाने लखवीला तुरुंगान स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi will be released from jail | मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. २९ - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाक न्यायालयाने लखवीला तुरुंगान स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला दोन आठवड्यांपूर्वी पाकमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यावर चोहोबाजूंनी टीका झाल्यावर पाक सरकारने लखवीला तुरुंगातच स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.  लखवीच्या वकिलांनी कारागृह प्रशासनास जामिनाचे आदेश दाखविण्यापूर्वीच प्रशासनाने त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश तुरुंग अधीक्षकांना सोपविले. त्यामुळे त्याची सुटका टळली होती.  सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लखवीला स्थानबद्ध करण्यात आले होते. 

पाक सरकारच्या या निर्णयाला लखवीने चार दिवसांपूर्वी इस्लामाबाद हायकोर्टात आव्हान दिले. स्थानबद्ध करण्याच्या निर्णयात कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नाही व स्थानबद्धतेसाठी जे कारण दिले आहेत ते देखील पुरेसे नाही असा दावा लखवीच्या वकिलांनी हायकोर्टासमोर केला होता. सोमवारी हायकोर्टाने लखवीला दिलासा देत स्थानबद्ध करण्याचे निर्णय रद्द केला.  लखवीच्या सुटकेविषयी भारताने पाककडे निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi will be released from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.