Breaking : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:57 PM2019-07-17T12:57:59+5:302019-07-17T13:39:02+5:30
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.
लाहोर : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Jamatud Dawa's Hafiz Saeed arrested and sent to judicial custody: Pakistan media (file pic) pic.twitter.com/1Txu9BlvoK
— ANI (@ANI) July 17, 2019
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद व त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक केल्याचे समजते. मात्र, मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले आहे.
मुंबई हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक https://t.co/fUWIufX59Y#HafizSaeedpic.twitter.com/jxA081xj5x
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2019
दररम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी समूह आणि दहशवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अर्थसाह्यावर लगाम घालण्यास सुरुवात केली होती. यात दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठाप्रकरणी जमात उद दावाच्या 12 नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.