हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 02:01 PM2024-08-14T14:01:07+5:302024-08-14T14:01:23+5:30

लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे.

Murder case registered against Sheikh Hasina as No interference in internal affairs of Bangladesh- US | हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका

हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा! बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही- अमेरिका

ढाका/वॉशिंग्टन: बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकेचे  व्हाईट हाऊसने फेटाळून लावला आहे. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर बांगला देशात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव कॅरिन जीन पियर यांनी सांगितले की, ‘बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेत आमचा सहभाग नाही. या घटनांमध्ये अमेरिकी प्रशासनाचा सहभाग असल्याच्या कोणत्याही बातम्या किंवा अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. बांगलादेशातील लोकांचे भविष्य ठरवणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. 

हिंदूंसाठी हॉटलाइन

- लोकांना हिंदू मंदिरे, चर्च किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील हल्ल्यांबद्दल माहिती देण्यासाठी बांगलादेशच्या सरकारने हॉटलाइन स्थापन केली आहे. 
- शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि भारतात आश्रय घेतल्यानंतर धार्मिक स्थळे, दुकाने आणि अल्पसंख्याकांच्या मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बातम्यांदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सरकारविषयी मत बनवण्यापूर्वी संयम बाळगा

- बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी येथील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात पीडित हिंदू समुदायाच्या सदस्यांची भेट घेऊन दिलासा दिला. 
- पूजाउजपन परिषदेचे अध्यक्ष बासुदेव धर, सरचिटणीस संतोष शर्मा, सर्वजनीन पूजा समितीचे अध्यक्ष जयंत कुमार देव, सरचिटणीस तपस चंद्र पाल आणि हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेच्या अध्यक्षीय सदस्य काजोल देबनाथ आणि संयुक्त महासचिव मनींद्र कुमार नाथ उपस्थित होते.

काय घडले?

- बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि संसदीय निवडणुका घेण्याच्या प्रयत्नांचे राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्वागत केले आहे.
- ढाका येथील भारतीय व्हिसा केंद्राचे  मर्यादित कामकाज पुन्हा सुरू.

शेख हसीना यांच्या नजीकच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे वैध : युनूस

- माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांचे राजीनामे वैध आहेत, असा दावा बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी केला. 
- ‘सर्व पावले कायदेशीररीत्या उचलण्यात आली आहेत. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य बहाल करण्याला अंतरिम सरकारचे प्राधान्य आहे,’ असे सांगत युनूस यांनी माजी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांना ‘जल्लाद’ असे संबोधले.

दुकान मालकाच्या मृत्युप्रकरणात गुन्हा

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहाजणांविरुद्ध गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान एका किराणा दुकानमालकाच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले. भारतात शरण घेतलेल्या हसीना यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

Web Title: Murder case registered against Sheikh Hasina as No interference in internal affairs of Bangladesh- US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.