खशोगींच्या हत्येचे आदेश दिले होते स्काईपवरून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:05 AM2018-10-24T04:05:56+5:302018-10-24T04:06:04+5:30

पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या करण्याचे आदेश सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्या अतिशय विश्वासातील अल कहतानी यानेच स्काईपवरून दिल्याचे समोर आले आहे.

 The murder of Khashogi was ordered from Skype | खशोगींच्या हत्येचे आदेश दिले होते स्काईपवरून

खशोगींच्या हत्येचे आदेश दिले होते स्काईपवरून

Next

वॉशिंग्टन : पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या करण्याचे आदेश सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्या अतिशय विश्वासातील अल कहतानी यानेच स्काईपवरून दिल्याचे समोर आले आहे.
तुर्कस्तान सरकारने दिलेले पुरावे आणि अमेरिकेचा दबाव यामुळे दूतावासात त्याची हत्या करण्यात आली, असे उघड झाले. कहतानीकडे सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्या सोशल मीडियाची जबाबदारी आहे. खशोगी हत्या प्रकरणानंतर कहतानी व चार अधिकारी यांना बडतर्फ करण्यात आल्याचे तेथील सरकारने जाहीर केले आहे. मात्र, कहतानी यांच्या सांगण्याशिवाय खशोगीची हत्या केली, यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणजेच कहतानी यांनी जे केले, ते राजे सलमान यांच्या आदेशानुसारच, असे सर्वांना वाटत आहे. खशोगी यांचे राजे सलमान यांच्याशी एके काळी घनिष्ठ संबंध होते.

Web Title:  The murder of Khashogi was ordered from Skype

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.