Murree Tragedy : पाकिस्तानवर कोसळलं आसमानी संकट, २१ पर्यटकांचा मृत्यू; शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:09 PM2022-01-08T18:09:20+5:302022-01-08T18:09:59+5:30

Murree Tragedy: पाकिस्तानातील मुरी पर्यटन स्थळावर शनिवारी आसमानी संकट कोसळलं. मुसळधार बर्फ पडल्यानं येथील रस्त्यांवर हजारो वाहनं अडकून पडली होती

Murree Tragedy: 21 die in Murree as govt deploys Pakistan Army to rescue stranded tourists amid heavy snowfall; Mourning by Shahid Afridi, Shoaib Malik | Murree Tragedy : पाकिस्तानवर कोसळलं आसमानी संकट, २१ पर्यटकांचा मृत्यू; शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक

Murree Tragedy : पाकिस्तानवर कोसळलं आसमानी संकट, २१ पर्यटकांचा मृत्यू; शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक

Next

Murree Tragedy: पाकिस्तानातील मुरी पर्यटन स्थळावर शनिवारी आसमानी संकट कोसळलं. मुसळधार बर्फ पडल्यानं येथील रस्त्यांवर हजारो वाहनं अडकून पडली होती. त्यांना वेळीच मदत न मिळाल्यानं २१ जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन बालकांचाही समावेश आहे. येथे बचावकार्य सुरू करण्यात आलं असून पाकिस्तानी आर्मीला बोलावण्यात आलं आहे. बचावकार्यातही अनेक अडथळे येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक यांनीही शोक व्यक्त केला आहे. 

.
शहरात हजारो वाहनं आल्यामुळे मुरीला जाणारा मार्ग ब्लॉक झाला आणि त्यामुळे पर्यटकांना रस्त्यावरच रहावे लागले.  मागील १५-२० वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येनं पर्यटक येथे आले नसल्याचे मंत्री शेख रशीद यांनी सांगितले. त्यामुळेच इस्लामाबाद ते मुरी येथील मार्ग बंद करावा लागला. कडाक्याच्या थंडीनं २१ जणांचा मृत्यू झाला.  
पण, मुरी पोलीस स्थानकाचे SHO राजा रशीद यांच्यामते ४ ते साडेचार फूट बर्फ पडला. यापूर्वी एवढा बर्फ कधी पडला नव्हता. हे पर्यटक थंडीमुळे नव्हे तर गाडीतील हिटर चालू करून चालू झोपल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.   

शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक यांनी व्यक्त केला शोक



Web Title: Murree Tragedy: 21 die in Murree as govt deploys Pakistan Army to rescue stranded tourists amid heavy snowfall; Mourning by Shahid Afridi, Shoaib Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.