कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:52 AM2024-01-06T11:52:57+5:302024-01-06T11:53:15+5:30

‘कॅशेक्सिया’मुळे स्नायूंवर होणारे गंभीर परिणाम ठरतात घातक

Muscle power is important in cancer if the muscles survive, the patient will survive | कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

कॅन्सरमध्ये ‘मसल पॉवर’ महत्त्वाची, स्नायू टिकले, तर रुग्ण टिकणार 

ग्रेटर सडबरी (कॅनडा) : जवळजवळ एक तृतीयांश कर्करोगाच्या रुग्णांचा मृत्यू अशा दुष्परिणामांमुळे होतो ज्याबद्दल तुम्ही कदाचित कधीही ऐकले नसेल आणि ते म्हणजे कॅन्सर कॅशेक्सिया. यात रुग्णाचे वजन लक्षणीय घटते, तसेच स्नायूंचे (मसल) मोठे नुकसान होते. स्नायू हालचाल, व्यायाम आणि चयापचयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पायऱ्या चढणे, कपडे धुणे, श्वासोच्छ्वास यासारख्या साध्या गोष्टी केवळ स्नायूंमुळेच शक्य होतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठी कॅशेक्सियाचे महत्त्व असूनही, या स्थितीवर उपचार करण्यात फारशी प्रगती झालेली नाही.

कर्करोग कॅशेक्सिया म्हणजे नक्की काय?
कर्करोग कॅशेक्सिया म्हणजे शरीराचे वजन नकळत कमी होणे आहे, ज्याचा प्रामुख्याने स्नायूंवर परिणाम होतो. 
कर्करोग रुग्णाचे सहा महिन्यांत त्याच्या शरीराच्या वजनाच्या पाच टक्क्यांहून अधिक वजन कमी होते, तेव्हा कॅशेक्सियाचे निदान होते.
१८० पौंड (८२ किलोग्रॅम) वजन असलेल्या व्यक्तीसाठी, हे नऊ पौंड किंवा
चार किलोग्रॅम वजन कमी करण्यासारखे आहे.

नेमके काय होते?
- स्नायू दररोज तुटतात आणि पुन्हा तयार होतात. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण स्नायूंना नुकसान पोहोचवतो. त्याची भरपाई स्नायू आणखी मजबूत करून होते.
- निरोगी व्यक्तीमध्ये हे संतुलन कायम राहते. तथापि, कॅशेक्सियात ही यंत्रणा बिघडते. त्यामुळे रुग्ण शक्ती गमावतो आणि त्याचा थकवा वाढतो.
- स्नायूंच्या अत्यधिक नुकसानीमुळे शेवटी हृदय आणि फुफ्फुस कार्य करणे थांबवू शकतात, ज्यामुळे मृत्यू होतो.

कॅशेक्सियाचे निदान आणि शोध
कॅशेक्सियाच्या उपचारांमध्ये सर्वांत मोठी बाब म्हणजे त्याचे लवकर निदान करणे आहे. कॅशेक्सियाचे निदान मुख्यत्वे वजन-संबंधित उपायांवर आधारित आहे. दुर्दैवाने, अनेक आरोग्य सेवा व्यावसायिक हे मूलभूत निदान मूल्यमापन करत नाहीत.

कॅशेक्सियावर उपचार काय?
दुर्दैवाने कॅन्सर कॅशेक्सिया असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रमाणित पर्याय नाहीत. कॅशेक्सियाचा सामना करण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे आणि आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत करून तो शक्य तितक्या लवकर सुरू केला पाहिजे. एरोबिक आणि क्षमता वाढीचे व्यायाम सर्वांत 
फायदेशीर आहेत.

Web Title: Muscle power is important in cancer if the muscles survive, the patient will survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.