आणीबाणीप्रकरणी मुशर्रफांवर ठपका
By admin | Published: September 11, 2014 11:39 PM2014-09-11T23:39:56+5:302014-09-11T23:39:56+5:30
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी आणीबाणी लागू करताना घटनेचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दोषी ठरविले आहे
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी आणीबाणी लागू करताना घटनेचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दोषी ठरविले आहे. २००७ मध्ये मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख या नात्याने आणीबाणी लागू केली होती. याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे.
देशद्रोहाच्या आरोपाची चौकशी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) करीत असून तिने मुशर्रफ यांना देशद्रोहाबद्दल दोषी ठरविले पाहिजे, असे न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती फैसल अरब यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या खंडपीठात मुशर्रफ यांच्यावरील आरोपाची सुनावणी फेडरल शरियत कोर्ट बिल्डिंगमध्ये सुरू आहे.
३ फेबु्रवारी २००७ रोजी मुशर्रफ यांनी अध्यक्ष या नात्याने प्रोव्हिजनल कॉन्स्टिट्यूशनल आॅर्डर (पीसीओ) अॅफेडेव्हिट जारी केले, असे एफआयएचे प्रमुख खालीद कुरेशी यांनी न्यायालयाला सांगितले. पीसीओ ही आणीबाणी असून तिच्यामुळे घटनाबाह्य आदेश तयार होतात व शेवटी घटना अंशत: किंवा पूर्णपणे निलंबित होते. (वृत्तसंस्था)