संगीत रामायण कार्यक्रमाने जिंकली जागतिक नेत्यांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:54 PM2017-11-13T22:54:35+5:302017-11-13T22:54:35+5:30
अशियायी देशांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेच्या सोमवारी झालेल्या उद््घाटन सोहळ््यात महाकाव्य रामायणावर आधारीत सादर झालेल्या संगीत कार्यक्रमाने जागतिक नेते व शिष्टमंडळांकडून जोरदार प्रशंसा मिळवली.
मनिला : अशियायी देशांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेच्या सोमवारी झालेल्या उद््घाटन सोहळ््यात महाकाव्य रामायणावर आधारीत सादर झालेल्या संगीत कार्यक्रमाने जागतिक नेते व शिष्टमंडळांकडून जोरदार प्रशंसा मिळवली. या सादरीकरणामुळे भारताच्या फिलिपाईन्स व इतर सदस्य दहा देशांशी असलेल्या सांस्कृतीक नात्याचे प्रतिबिंब उमटले. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे पंतप्रधान ली किकिआंग, जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि आशियायी देशांच्या अनेक नेते उपस्थित होते. फिलिपाईन्समध्ये रामायण ‘महारादिया लावाना’ या नावाने ओळखले जाते. त्याचा अर्थ ‘राजा रावण’ असा आहे. फिलिपाईन्सचे प्रसिद्ध नृत्य ‘सिंगकिल’ हे रामायणावर आधारीत आहे.
मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, अशियनचा उद््घाटन सोहळा हा संगीत राम हरीतील उताºयांसह रामायणावर आधारीत होता हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रामायणातील अनेक प्रसंग हे अत्यंत सुंदरपणे राम हरीत दाखवण्यात आले आहेत. बॅले फिलिपाईन्सचे अॅलिस रियेस यांनी हा संगीत कार्यक्रम सादर केला होता. देशात ही बॅले कंपनी १९६९ मध्ये स्थापन झालेली आहे.
रामायण हे अशियायी देशांत खूप लोकप्रिय आहे, असे सांगून मोदी यांनी या अत्यंत सुंदर कार्यक्रमाबद्दल तो सादर करणाºया कलाकारांचे कौतूक केले.