मुस्लिम मुलींना मुलांसोबत पोहोण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2017 08:31 PM2017-01-10T20:31:01+5:302017-01-10T20:31:01+5:30
एका मुस्लिम दाम्पत्याने न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
स्ट्रॉसबर्ग , दि. 10 - युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने एक ऐतिहासीक निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल असं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे स्विझर्लंडच्या शाळेतील मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे.
स्विझर्लंडच्या एका मुस्लिम दाम्पत्याने युरोपियन न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलांसोबत पोहोल्याने धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन होतं असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने याविरोधात निर्णय देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य ठरवला. याशिवाय न्यायलयाने याचिकाकर्त्यांना जवळपास 94 हजार रूपयांचा दंडही ठोठावला तसेच मुलींना पोहोण्याच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याचे आदेशही दिले.
स्विझर्लंडमध्ये बासर आणि अन्य अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी पोहोणं शिकणं अनिवार्य आहे. ज्या मुली वयाने सज्ञान आहेत त्याच मुलींना यामधून सूट मिळू शकते असं येथील शिक्षण अधिका-यांनी याविषयावर सांगितलं. स्विझर्लंड आपली परंपरा आणि गरजेनुसार अभ्यासक्रम ठरवण्यास स्वतंत्र आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे.