US Visa: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक असल्यास फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:09 PM2021-05-15T15:09:41+5:302021-05-15T15:10:15+5:30

US Visa: प्रियकर/प्रेयसी अमेरिकन नागरिक असून तो/ती अमेरिकेत वास्तव्यास असल्यास कोणत्या व्हिसासाठी अर्ज करावा? त्यासाठीची प्रक्रिया कशी आहे..?

My fiance is US Citizen and lives in the US Can I apply for a fiance visa | US Visa: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक असल्यास फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?

US Visa: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक असल्यास फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?

Next

प्रश्न: माझा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेन नागरिक आहे. मग मी फियान्से व्हिसासाठी अर्ज करू शकतो/शकते का?

उत्तर: होय, अमेरिकेचा नागरिक परदेशात राहणाऱ्या त्याच्या/तिच्या फियान्सेसाठी अर्ज करू शकतो. K-1 (फियान्से) व्हिसाच्या मदतीनं परदेशाती राहणारा प्रियकर/प्रेयसी अमेरिकेत येऊन तिच्या अमेरिकन नागरिक असलेल्या प्रियकर/प्रेयसीसोबत लग्न करू शकतो/शकते. मात्र अमेरिकेत दाखल झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांनी विवाह करायला हवा. K-1 अर्जदाराच्या अल्पवयीन मुलालादेखील K-2 व्हिसा मिळू शकतो आणि तो प्रियकर/प्रेयसीसोबत प्रवास करू शकतो. यासाठी अर्जदाराकडे K1 पालकांकडे असलेली सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. यामध्ये पालक-मूल यांचं नातं दाखवणाऱ्या पुराव्यांचादेखील समावेश असावा. अमेरिकेतील व्यक्तीशी विवाह केल्यानंतर, परदेशातील नागरिक कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक (एलपीआर) होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (डीएचएस), यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) अर्ज करू शकता.

मंजूर करण्यात आलेला K1 अर्ज यूएससीआयएसकडून मंजूर झाल्यानंतर चार महिन्यांसाठी वैध असतो. दूतावासातील अधिकारी याचिकेची वैधता वाढवू शकतात. प्रेमी युगुलानं ९० दिवसांच्या आत लग्न न केल्यास परदेशातून आलेल्या व्यक्तीला देश सोडावा लागेल.

फियान्से व्हिसासाठीची प्रक्रिया काय?
अमेरिकेच्या नागरिकानं त्याचं वास्तव्य असलेल्या भागातील यूएससीआयएस कार्यालयात परदेशातील असलेल्या प्रियकर/प्रेयसीसाठी आय-१२९ अर्ज दाखल करायला हवा. यूएससीआयएस कार्यालयानं तुमचा अर्ज मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रीय व्हिसा सेंटरकडे (एनव्हीसी) पाठवला जातो. एनव्हीसी अर्जदाराला केस नंबर देईल आणि तो अर्ज अमेरिकेच्या दूतावासाकडे किंवा वकिलातीकडे पाठवेल. याची माहिती एनव्हीसी अर्जदाराला मेलच्या माध्यमातून देईल.

यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात? प्रक्रियेत कशाचा समावेश?
अर्ज DS-160 ऑनलाईन भरलेला असावा.
लाभार्थ्याकडे अमेरिकेपर्यंत प्रवास करण्यासाठी वैध पासपोर्ट असावा.
जन्मदाखला
अर्जदार आणि लाभार्थ्याच्या माजी पती/पत्नीचे घटस्फोट किंवा मृत्य प्रमाणपण (असल्यास)
१६ वर्षे किंवा त्यावरील व्यक्तीचे पोलीस प्रमाणपत्र
वैद्यकीय चाचणी
आर्थिक मदतीचे पुरावे
दोन 2x2 पासपोर्ट फोटो
नात्याचा पुरावा

वरील कागदपत्रांसोबतच मुलाखत घेणारा दूतावासातील अधिकारी नात्यांचे आणि आर्थिक मदतीचे अधिक पुरावे मागू शकतो.

मी माझ्या डॉक्टरांनी दिलेला वैद्यकीय अहवाल जमा करू शकतो का?
नाही, अधिकृत डॉक्टरांच्या पॅनलकडून सर्व अजदारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. अर्जदार ज्या अमेरिकेन दूतावासात किंवा वकिलातीत व्हिसासाठी अर्ज करतो, तिथूनच लाभार्थ्याला वैद्यकीय चाचणीसंबंधीच्या सूचना दिल्या जातात. यामध्ये अधिकृत डॉक्टरांच्या पॅनलच्या माहितीचादेखील समावेश असतो.

सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

Web Title: My fiance is US Citizen and lives in the US Can I apply for a fiance visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.