म्यानमार ६,९६६ कैदी मुक्त करणार
By admin | Published: July 31, 2015 01:40 AM2015-07-31T01:40:31+5:302015-07-31T01:40:31+5:30
म्यानमारने २५० विदेशींंसह हजारो कैद्यांच्या सुटकेचे आदेश गुरुवारी दिले. सुधारणावादी सरकारने शेकडो बंडखोरांना यापूर्वीच माफी दिली असून आजचे हे आदेश त्याच मालिकेचा एक भाग आहे.
यंगून : म्यानमारने २५० विदेशींंसह हजारो कैद्यांच्या सुटकेचे आदेश गुरुवारी दिले. सुधारणावादी सरकारने शेकडो बंडखोरांना यापूर्वीच माफी दिली असून आजचे हे आदेश त्याच मालिकेचा एक भाग आहे.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेईन सेईन यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ६,९६६ कैद्यांच्या सुटकेचे आदेश दिले असून यात २१० विदेशींचा समावेश आहे. या कैद्यांनी शिस्त राखल्यास त्यांची सुटका केली जाईल, असे माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये १५५ चिनी नागरिकांचा समावेश आहे. त्यांना देशाच्या उत्तर भागात बेकायदेशीररीत्या झाडे तोडताना पकडण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. (वृत्तसंस्था)