म्यानमारमध्ये दरडी कोसळून ९० ठार
By admin | Published: November 22, 2015 11:52 PM2015-11-22T23:52:26+5:302015-11-22T23:52:26+5:30
उत्तर म्यानमारमधील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पाचूच्या खाणीजवळ दरडी कोसळून किमान ९० जण ठार आणि अन्य कित्येक जण बेपत्ता झाले.
Next
यंगून : उत्तर म्यानमारमधील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पाचूच्या खाणीजवळ दरडी कोसळून किमान ९० जण ठार आणि अन्य कित्येक जण बेपत्ता झाले.
पाचू हे रत्न काढण्यासाठी खाण कंपन्यांनी जमीन खोदली होती. खोदकाम करताना बाहेर काढलेली माती आणि कचरा यांचा ढिगारा करण्यात आला होता. हा ढिगारा एखाद्या डोंगराप्रमाणे विशाल आकाराचा होता. तोच ढिगारा खाली आल्याने त्याखाली दबून बहुतेक जण मरण पावले.
उत्तर म्यानमारमधील काचीन प्रांतात ही दुर्घटना घडली. खाणीतून पाचू मिळाल्यानंतर आपले नशीब बदलेल आणि गरिबी दूर होईल, या आशेने अनेक लोकांनी या भागात झोपड्या उभारून तेथे वास्तव्य केले होते.